• Home
  • ताज्या बातम्या
  • दि.२ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; सर्व शासकीय सेवा सोमेश्वर मध्ये एकाच छताखाली होणार उपलब्ध.
Image

दि.२ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; सर्व शासकीय सेवा सोमेश्वर मध्ये एकाच छताखाली होणार उपलब्ध.

 प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत बारामती विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे, श्री शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोमेश्वरनगर (ता. बारामती, जि. पुणे) येथे होणार आहे.

या शिबिरामध्ये महसूल, कृषी, आरोग्य, पुरवठा, ग्रामविकास, परिवहन (एस.टी.), पशुसंवर्धन, वन, महिला व बालकल्याण, महावितरण, आरटीओ, पोस्ट, भूमी अभिलेख तसेच विविध शासकीय विभागांच्या योजना व सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शिबिरात महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले, आधार कार्ड दुरुस्ती सेवा, एसटी महामंडळाचे NCMC कार्ड, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, कर्जमाफीसंदर्भातील प्रमाणीकरण, ई-पीक पाहणी अर्ज, विविध शासकीय योजनांचे अर्ज स्वीकारणे व लाभार्थींना मार्गदर्शन आदी सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचे तातडीने निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.

या शिबिरासाठी मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय, बारामती यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

बारामती तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय, बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Releated Posts

मुंबईत भारतीय पत्रकार संघाची वार्षिक महासभा उत्साहात

प्रतिनिधी. पत्रकारांचे राष्ट्रीय कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय पत्रकार संघाची १२ वी वार्षिक राष्ट्रीय महासभा मुंबईतील अंधेरी पश्चिम…

ByBymnewsmarathi Jul 29, 2026

‘एक अधिकारी, एक सरकारी गाडी’ : केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; अतिरिक्त पदभारासाठीही दुसरे वाहन नाही

प्रतिनिधी शासकीय खर्चात बचत, सरकारी वाहनांचा कार्यक्षम वापर आणि प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय…

ByBymnewsmarathi Jul 28, 2026

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

प्रतिनिधी. बारामती – बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने (ओळख गोपनीय ठेवण्यासाठी काल्पनिक नाव “निर्भया”) दिलेल्या फिर्यादीवरून…

ByBymnewsmarathi Jul 28, 2026

मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात २७ वा कारगिल विजय दिन उत्साहात साजरा

सोमेश्वर नगर प्रतिनिधी. _विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारा प्रेरणादायी उपक्रम_ सोमेश्वरनगर (ता. बारामती) : मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या…

ByBymnewsmarathi Jul 28, 2026