Skip to main content

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लोकनेते कै. बाबालालजी काकडे देशमुख पुण्यतिथी निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न…
Image

लोकनेते कै. बाबालालजी काकडे देशमुख पुण्यतिथी निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी.
निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय, निंबुत यांच्या वतीने सोमवार दिनांक ३ऑगस्ट २०२६ रोजी लोकनेते कै. बाबालालजी काकडे दे. यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन विद्यालयात करण्यात आले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा याच दिवशी सायंकाळी ४.००वा. संपन्न झाला.
या वर्षी सलग नवव्या वर्षी आयोजित झालेल्या या स्पर्धेमध्ये लहान व मोठ्या गटातील एकूण ५५ विद्यार्थ्यांनी बारामती तालुक्यातील विविध शाळांतून सहभाग घेतला.
स्पर्धेची सुरुवात कै. बाबालाल काकडे देशमुख यांच्या प्रतिमापूजनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले.त्या म्हणाल्या, “बाबांचे संपूर्ण जीवन हे समाजासाठी वाहिलेलं होतं. शिक्षण, सहकार, माणुसकी हे त्यांच्या कार्याचे मुख्य आधारस्तंभ होते.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.सतीशभैय्या काकडे देशमुख हे होते.आपल्या भाषणात त्यांनी बाबांच्या जीवनातील निरपेक्ष सेवा, शिक्षणप्रेम व सहकार दृष्टिकोन यांचा उल्लेख करत, “आजच्या पिढीने वक्तृत्वाच्या माध्यमातून बाबांच्या विचारांना पुढे नेणं, हीच खरी श्रद्धांजली आहे,” असे सांगितले.
तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा.श्री. भीमराव बनसोडे सर यांनी बाबांच्या कार्यकर्तृत्वाचे अनुभवपूर्वक वर्णन करत सांगितले की, “बाबांनी जे मूल्यमंत्र दिले, तेच आजच्या काळातील दिशादर्शक आहेत.”
बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. सुप्रियाताई पाटील या होत्या. वक्तृत्व स्पर्धेतील विषय निवडण्यापाठीमागील भूमिका त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केली.व पुढील वर्षी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री प्रकाशराव बाबालाल काकडे दे. तसेच सौ. रोहिणी ताई प्रकाशराव काकडे दे.उपस्थित होते
बाबांच्या सानिध्यात भरपूर काळ घालवणारे श्री. भगवानराव गडदरे आणि श्री. शिवाजी गडदरे हे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, संचालक, पालक, विविध शाळांचे स्पर्धक व त्यांचे शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:
🏅 *लहान गट – विजेते स्पर्धक:*

*प्रथम* – कु. शरयू रामदास गावडे
(नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे.)

*द्वितीय* – कु. राजनंदिनी राजेंद्र शिंदे
(नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे.)

*तृतीय* – कु.अनुजा तात्यासो गाडेकर
(न्यू इंग्लिश स्कूल, पांढरवस्ती)

*उत्तेजनार्थ* – कु. स्वरांजली शिवराम गडदरे
(माध्यमिक विद्यालय गडदरवाडी)

🏅 *मोठा गट – विजेते स्पर्धक:*

*प्रथम*- साईराज यशवंत जगदाळे
(शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर)

*द्वितीय*- प्रसाद उमेश खेडकर
(सुपे इंग्लिश मीडियम स्कूल, सुपे )

*तृतीय*- स्वरीत पंकज अहिरे
(अनेकांत इंग्लिश मेडीयम स्कूल बारामती.)

*उत्तेजनार्थ*- कु. जिया फिरोज तांबोळी.
(विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल विद्यानगरी,बारामती)

विजेत्या स्पर्धकांना बक्षीस म्हणून स्मृतीचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विचारमंथन व समाजभान रुजल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
तसेच बारामती पंचायत समिती बारामती आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार साहेब यांच्या पुढाकारातून विद्यालयातील सहा विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या पदाधिकारी व मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे देशमुख यांच्याकडून कौतुक व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.

Releated Posts

रेगुलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी सोमेश्वरनगर : पश्चिम बारामती भागातील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वरनगर येथे पार पडली. यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज  महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

कै. बाबालाल साहेबराव काकडे – देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महावि‌द्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026