मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 07 August 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

राष्ट्रीय आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत एआयसीटी डिझाईन अकादमीचे घवघवीत यश; निंबुतच्या गाथा काकडेचा विशेष सत्कार

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 7, 2026 1 मिनिट वाचन 8,531 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

पिंपरी-चिंचवड, दि. ७ (प्रतिनिधी): जेईई (बी.आर्किटेक्चर) आणि नाटा (NATA) या राष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक्चर प्रवेश परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या चिंचवड येथील एआयसीटी डिझाईन अकादमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक अधिक उंचावला असून, यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळविणाऱ्या कृष्णा कल्याणकर, गाथा काकडे, समिक्षा शिंदे, मुक्ता महामुनी, समृद्धी साबळे, वेदिका मुतांगे, ख्याती खंबायत, हरडे आणि युवराज डागलिया या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
यामध्ये बारामती तालुक्यातील निंबुत गावची कन्या गाथा काकडे हिने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल विशेष सन्मान मिळविला. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित सत्कार समारंभात तिच्या यशाचे विशेष कौतुक करण्यात आले. तिच्या या यशामुळे निंबुत गावासह बारामती तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
कार्यक्रमात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा राजेश सप्रा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केल्याचे नमूद करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेत एआयसीटी डिझाईन अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, आगामी काळातही अशीच यशस्वी परंपरा कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख