मुख्य मजकुरावर जा
Friday, 11 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 11 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

दुर्मिळ आजाराचा चमत्कार: २६ वर्षे पुरुष म्हणून जगला, पण तपासणीत समोर आली शरीराची अद्भूत सत्यता

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 11, 2026 1 मिनिट वाचन 3,503 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

​नवी दिल्ली येथील एका रुग्णालयात वैद्यकीय विश्वाला अचंबित करणारी अत्यंत दुर्मिळ घटना समोर आली आहे. लग्नानंतर मूल होत नसल्याने वंध्यत्व तपासणीसाठी गेलेल्या एका २६ वर्षीय तरुणाच्या शरीरात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बाह्य शरीराने आणि गुणसूत्रांनी पूर्णपणे पुरुष असणाऱ्या या तरुणाच्या पोटात स्त्रियांप्रमाणे पूर्ण विकसित झालेले गर्भाशय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

राजौरी गार्डन येथील ‘आर. जी. हॉस्पिटल’मध्ये हा प्रकार उघडकीस आला. हा तरुण सामान्य पुरुषांसारखेच जीवन जगत होता आणि त्याच्यामध्ये पुरुषांची सर्व शारीरिक लक्षणे व गुणधर्म होते. मात्र, विवाहाfter काही वर्षे लोटूनही मूल होत नसल्याने त्याने युरोलॉजिस्ट डॉ. सुशील खरबंदा यांच्याकडे जाऊन वंध्यत्व तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

शारीरिक तपासणीदरम्यान त्याच्या अंडकोशाच्या पिशवीत दोन्ही टेस्टीज (वृषण) अनुपस्थित असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. वीर्य तपासणीत एकही शुक्राणू नसून ‘अझोस्पर्मिया’  ही स्थिती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर करण्यात आलेल्या सोनोग्राफी आणि एमआरआय स्कॅनिंगमधील अहवाल पाहून डॉक्टरही थक्क झाले. हा तरुण जनुकीयदृष्ट्या ‘XY पुरुष’ असला, तरी त्याच्या पोटात पूर्णपणे विकसित झालेले गर्भाशय  आणि फॅलोपियन ट्यूबसारखी रचना असल्याचे समोर आले. त्याचे टेस्टीज पोटातच राहिल्यामुळे ते स्त्रियांच्या अंडाशयासारखे  दिसत होते.

वैद्यकीय भाषेत या दुर्मिळ विकाराला ‘पर्सिस्टंट मुलेरियन डक्ट सिंड्रोम’ (PMDS) म्हटले जाते. हा एक अत्यंत दुर्मिळ जन्मजात विकार आहे, ज्यामध्ये व्यक्तीची गुणसूत्रे पुरुषांसारखीच असतात, परंतु शरीराच्या अंतर्गत रचनेत गर्भाशय कायम राहते. वयाची २६ वर्षे लोटेपर्यंत हा आजार कधीही लक्षात आला नव्हता.

पोटाच्या भागात दीर्घकाळ लपून राहिलेल्या टेस्टीजमुळे भविष्यात कर्करोगाचा  धोका निर्माण होऊ शकत होता. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने पावले उचलत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करून ते गर्भाशय आणि टेस्टीज शरीरातून यशस्वीपणे बाहेर काढले आहेत. या दुर्मिळ घटनेने वैद्यकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख