शेतकरी कृती समिती सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक लढवणार यासाठी मंगळवार दि. २२/९/२०२६ रोजी निंबुत येथे सकाळी १०.०० वाजता मेळाव्याचे आयोजन… श्री सतिश काकडे
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आणि त्यासाठी सभासदांनी फॉर्म भरलेले आहेत. परंतु आपल्या सर्वांचे नेते के अजितदादा पवार यांचे अपघाती दुखद निधन झाल्यामुळे दादा वरोवरचे असलेल्या ऋणानुबंधामुळे कृती समितीच्या वतीने कोणताही गाजावाजा न करता कृती समितीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. सोमवारी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे सभासदांच्या हितासाठी कृती समिती नेहमीच ठोस भूमिका घेत असते, खंबीरपणे सभासदांच्या पाठीमागे उभी राहत असते, शेतकरी सभासदांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन मोर्चे उपोषणे कृती समितीच्या माध्यमातून अनेक वेळा केलेली आहेत.
तसेच शेतकरी सभासदांसाठी कृती समितीचे नेते व सहकारी वेळप्रसंगी आठ दिवस दोन वेळा ऐन दिवाळीच्या काळामध्ये येरावडा कारागृह भोगून आले आहेत. कै अजित पवार यांच्या निधनानंतर शांततेत उमेदवारी अर्ज दाखल करणे गरजेचे असताना स्वतःला राष्ट्रवादीचे निष्ठावान समजणाऱ्या काही लोकांनी शक्ती प्रदर्शन करीत मोठ्या गाजावाजामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले यामुळे सभासदांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच कृती समितीचे सर्व पात्र उमेदवार व कृती समितीवर प्रेम करणारे सभासद यांची एकत्रित मीटिंग 22 सप्टेंबर रोजी मंगळवारी सकाळी 10 वाजता बाबा कमल सभागृह निंबुत येथे आयोजित केलेली आहे.
सदर बैठकीमध्ये सुनैत्राताई पवार यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे निवडणुकीमध्ये युती करावयाची का निवडणुक स्वतंत्र लढवायची याचा विचार विनिमय करावयाचा आहे चेअरमन स्वतःच्या मालकीचा खाजगी कराखाना असल्यासारखे वागतात, कारखान्याच्या पैशांचा दुरउपयोग करून गैरमार्गाने दुकानांसमोर पत्रे ठोकणे याबाबत विचार करणे असे सर्व प्रकार मा. सुनैत्राताई पवार यांच्या कानावर घालणे. या सर्व गोष्टीबाबत चर्चा करावयाची आहे. कृती समितीच्या मागन्यांचा विचार न केल्यास समविचारी लोकांना, अपक्ष यांना एकत्रीत करून पक्षविरहीत पॅनेल उभा करणे साठी निर्णय घेणे कामी विचार विनिमय करायचा आहे.
पेपरच्या माध्यमातून बऱ्याच राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित केल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी सर्व कृती समितीचे सर्व कार्यकर्ते, सभासद यांनी मोठ्या संख्येने दि. २२/९/२०२६ सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहण्याचे कृती समितीच्या नावाने आवाहन करण्यात आलेले आहे.
सोमेश्वरचे विद्यमान चेअरमन यांनी गावोगावी मेळावे करीत आहेत परंतु त्यांना न मिळणारा प्रसिसाद पाहता. तसेच विद्यमान चेअरमन हे जनतेसमोर असे भासत आहेत की मीच फक्त कारखाना चालवु शकतो असा अहिरभाव आणत आहेत. वार्षिक सभेमध्ये देखील स्वतःचीच मनमानी करून सभासदांना – स्वतःचे विचार मांडण्यापासून रोखले जात आहे. कोणत्याही प्रश्नाला मीटिंगच्या वेळेस उत्तर न देता स्वतःचा खाजगी कारखाना असल्या सारखे वागत आहेत, माइक बंद करणे, प्रोसिडिंग बोगस लिहिणे, या आरेरावीचा निषेध म्हणुन आम्ही सर्व सभासदांना कळवत आहोत की, उद्याच्या 21 तारखेला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मीटिंगमध्ये कृती समिती कोणत्याही प्रकारे सहभागी होणार नाही.
