मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 25 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 25 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सोमेश्वरच्या संचालकांमध्येच मतभेद? गावभेटींमध्ये दबलेल्या भावना व्यक्त होऊ लागल्या; विरोध नेमका कोणाला?

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 25, 2026 1 मिनिट वाचन 3,503 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

संपादक-  मधुकर बनसोडे

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आता माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच सोमेश्वर कारखाना निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे सभासदांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नेतृत्वासमोरही ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, सोमेश्वरच्या विद्यमान संचालक मंडळातच अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गावभेटी, बैठका आणि सभासदांशी संवाद साधताना काही संचालकांच्या वक्तव्यांमधून कळत-नकळत मनातील नाराजी किंवा दबलेल्या भावना व्यक्त होत असल्याची चर्चा आहे.

मात्र ही नाराजी नेमकी कोणाबद्दल आहे, हा सध्या चर्चेचा मुख्य विषय आहे.

विरोध एखाद्या व्यक्तीला आहे?

की एखाद्या निर्णयप्रक्रियेला?

उमेदवारीच्या समीकरणांवरून नाराजी आहे?

की कारखान्यातील भविष्यातील नेतृत्वाचा हा संकेत आहे?

या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

उमेदवारी अर्जांची मोठी संख्या पाहता माघारीनंतर कोण मैदानात राहते, कोण कोणाच्या पाठीशी उभे राहते आणि कोणाची भूमिका बदलते, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

बाहेरील विरोधकांपेक्षा अंतर्गत समीकरणेच सोमेश्वरच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार का? याची उत्सुकता आता वाढली आहे.

गावभेटींमधून उमटणारे संकेत आणि आगामी काही दिवसांतील राजकीय हालचाली यावरून या चर्चांना कितपत आधार आहे, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच सवाल चर्चेत आहे—

“संचालकांमध्ये मतभेद आहेत का? आणि विरोध नेमका कोणाला?”

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख