मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 28 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 28 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती! वडगाव निंबाळकरमध्ये SIR सुनावणीला सुरुवात; नोटीसधारक ग्रामस्थांच्या कागदपत्रांची पडताळणी.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 28, 2026 1 मिनिट वाचन 3,505 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी- फिरोज भालदार

SIR प्रक्रियेंतर्गत ज्या ग्रामस्थांना त्रुटींबाबत नोटिसा प्राप्त झाल्या आहेत अशा ग्रामस्थांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सुनावणी घेण्याचे काम सुरू आहे. निवासी नायब तहसीलदार बारामती नामदेवराव काळे यांच्या उपस्थितीत वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत कार्यालयात ही सुनावणी प्रक्रिया पार पडत आहे.

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत कार्यालय येथे २८ व २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तलाठी कार्यालयाचे तलाठी किरण रंधवे यांच्यासह वडगाव निंबाळकर हद्दीतील सर्व BLO उपस्थित होते. संबंधित BLO यांनी त्यांच्या मतदार यादीतील त्रुटी असलेल्या ग्रामस्थांना आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीसाठी उपस्थित केले.

वडगाव निंबाळकर गावातील मतदार यादीचे एकूण सहा भाग करण्यात आले आहेत. त्यापैकी २८ सप्टेंबर रोजी तीन भागांतील ग्रामस्थांची सुनावणी घेण्यात आली असून, उर्वरित तीन भागांतील ग्रामस्थांची सुनावणी २९ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती सुनावणी अधिकारी नामदेवराव काळे यांनी दिली.

SIR प्रक्रियेंतर्गत ज्यांची सुनावणी अद्याप बाकी आहे अशा ग्रामस्थांनी संबंधित नोटिसीमध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे घेऊन वेळेत उपस्थित राहून आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी असे आवाहन सुनावणी अधिकारी नामदेवराव काळे यांनी केले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख