प्रतिनिधी.
ब्रम्हपूरी तालुक्यातील उदापुर येथील तात्कालीन सरपंच व विद्यमान उपसपंच योगेश्वर तात्यांनी तुपट व ग्रामसेवक दिनेश येरणे हे सन २०१०ते सन२०१५ या कार्यकाळात पदावर असतांना उदापुर येथे नळ योजना कार्यान्वित करण्यात आली.याच कालावधीत अगोदरच दोन शिपाई कामावर रुजु असतांना उदापुर येथील तिस-या एक व्यक्तीला प्रति दिवस १०० प्रमाने उदापुर मधील एक व्यक्तीला मदतगार म्हणून घेवुन हयात
नसलेले व्यक्तीचे नाव हजेरी पटावर दाखवुन २५वर्षाअगोदर मरण पावलेल्या व्यक्तींच्या नावे व्हावचर वर सही करुन पैशाची उचल केली असल्याचे. ब्रम्हपुरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जयंन्द्र राऊत ने केलेल्या चौकशीत उघड झाले.सदर ही माहिती महीतीच्या अधीकारातुन उदापुर येथील दिवाकर मंडपेनी मिळवुन या प्रकरणाची चौकशी झाली.पाहीजे म्हणुन गटविकास अधिकारी संजय पुरी यांचे कडे तक्रार केली असल्याने गटविकास अधिकारी संजय पुरी यांनी तात्कालीन सरपंच योगेश्वर तात्यांनजी तुपट,व ग्रामसेवक यांचे विरोधात
ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये रितसर यांचे विरोधात तक्रार केल्याने तात्कालीन सरपंच व विद्यमान उपसरपंच योगेश्वर तात्यांजी तुपट व ग्रामसेवक दिनेश येरणे यांचेवर अ.प.क्रमांक ४६१/२०२२ कलम ४२०,४६५,४६६,४६८,४७१,४०९नुसार गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली असल्याने. या प्रकारामुळे समस्त ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामपंचायती मध्ये एकच खळबळ माजली आहे.