विशेष प्रतिनिधी श्री शिवाजी काकङे –
आज निरा येथे अल्पावधीत नावारुपाला आलेल्या आचर्य अँकँङमीने निरा -निंबुत परीसरातील विद्यार्थ्यांनां 10वी नंतर पुढील वाटचाली बाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन निरा येथील श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजन केले होते या मेळाव्यास 200 हुन आधिक पालक व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना आचार्य अँकँङमीचे शैक्षणीक समन्वयक प्रा श्री बापु काटकर याँनी मार्गदर्शन केले तसेच आचार्य अँकँङमीचे संस्थापक श्री प्रा ज्ञानेश्वर मुटकुले यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले या शिबीरात 87 विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता चाचणी घेण्यात आली व या चाचणीतुन श्री बा .सा. काकङे दे विद्यालय पिंपरे खुर्द चा विद्यार्थ्यां चि. समर्थ गजानन कुसेकर याची निवड करण्यात आली
या विद्यार्थ्यांची 11वी 12वी ची अँकँङमीची ४ते ५ पाच लाख फी आचार्य अँकङमीचे संस्थापक श्री ज्ञानेश्वर मुटकुले सर यांनी माफ केल्याची घोषना केली व सदर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमास श्री शिवाजी काकङे ,श्री राञेंन्द बरकङे,गिरीजा ताकवले श्री गणेश फरांदे अन्य मान्यवर वपालक उपस्थित होते