• Home
  • इतर
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ३ हजार २७७ लाभार्थ्यांना लाभ*
Image

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ३ हजार २७७ लाभार्थ्यांना लाभ*

प्रतिनिधी.

पुणे, दि. ५: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष विभाग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा २०२२-२३ या वर्षात ३ हजार २७७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून एकूण अर्ज ३ हजार ६०० इतके प्राप्त झाले असल्याने उर्वरित लाभार्थ्यांना निधी प्राप्त होताच तात्काळ लाभ देण्यात येईल, असे समाज कल्याण पुणेच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी कळविले आहे.

सामाजिक न्याय विशेष विभागाच्या १३ जून २०१८ च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. शासनाने इयत्ता १० वी नंतरच्या इयत्ता ११ वी १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या मात्र शासकीय वसतिगृहात राहत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते.

या योजनेंतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत २०१७-१८ मध्ये ६५६ विद्यार्थ्यांना १६ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. २०१८-१९ मध्ये १ हजार ४५७ विद्यार्थ्यांना ७ कोटी ३० लाख ८२ हजार रुपये, २०१९-२० मध्ये १ हजार ५९७ विद्यार्थ्यांना ७ कोटी ३७ लाख १६ हजार रुपये, २०२०-२१ मध्ये ९३६ विद्यार्थ्यांना ८९ लाख १७ हजार रुपये, २०२१-२२ मध्ये १ हजार १६३ विद्यार्थ्यांना ३ कोटी ४ लाख ५९ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात अधिक प्रमाणात अर्ज प्राप्त होतात. या योजनेत २०२२-२३ मध्ये ३ हजार ६०० हर्ज प्राप्त झालेले असून प्राप्त १० कोटी ९ लाख ३८ हजार रुपये तरतूदीतून ३ हजार २७७ विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी विभागाकडे करण्यात आली आहे. तरतूद प्राप्त होताच सर्व अर्ज निकाली काढण्यात येतील. स्वाधार योजनेबाबत विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही श्रीमती डावखर यांनी केले आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025