• Home
  • इतर
  • तीन गावांना जोडणाऱ्या पुलाची अत्यंत दयनीय अवस्था ; दोन वेळा कामाची निवेदा निघूनही काम अपूर्ण?
Image

तीन गावांना जोडणाऱ्या पुलाची अत्यंत दयनीय अवस्था ; दोन वेळा कामाची निवेदा निघूनही काम अपूर्ण?

परळी प्रतिनिधी

पुलाचे काम तात्काळ करा, अन्यथा आंदोलन; सरपंच विजय राठोड व ग्रामस्थांचा इशारा…  तीन गावांना जोडणाऱ्या अंत्यत महत्वाच्या पुलाची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. तसेच दोन वेळा या कामाची निवेदा व पुलाचे काम मंजूर होऊनही काम झाले नसल्यामुळे करोडो रूपयांचा निधी असून काम अपूर्ण राहिले आहे. तसेच पुलाचे कठडे तुटल्यामुळे अपघात होत आहेत. घाणीच्या पाण्याच्या डबके झाल्यामुळे दुर्गधी पसरली आहे. पावसाळ्यात तर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे शेतकरी, वाहनधारक व नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रविवारी दि.०९ एप्रिल रोजी सरपंच व सदस्यांना दुरवस्था झालेल्या पुलाची पहाणी केली. त्यामुळे मलकापूर -मरळवाडी- मांडवा या तीन गावांच्या रस्ताना जोडणाऱ्या पुलाचे काम तात्काळ करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लामणतांडा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच विजय राठोड यांनी दिला आहे.

शहरातून मलकापुर मार्गे धर्मापुरीकडे जाणार्या पर्यायी रस्त्यावर मलकापूर, मांडवा, मरळवाडी या गावांची वाहतुक होते. या भागात दुग्ध व्यवसाय आहे.परळी शहरात काम करणारांची संख्या मोठी असल्याने दररोज दुचाकीवरुन ये- जा करावी लागते. मलकापूर- मरळवाडी-मांडवा या तीन गांवाच्या पुलांच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन होऊन तब्बल ५ वर्ष झाले तरी प्रत्यक्ष कामास अद्याप सुरुवात न झाल्याने हे काम होणार का नाही, मंजुर केलेल्या फंडाचे काय झाले असे प्रश्न निर्माण झाले असुन या कामांबाबत शासंकता व्यक्त होत असुन कामाच्या हलगर्जीपणामुळे तीन, चार गावातील वाहनधारक, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर एकुण तीन पुलांना मंजुरी मिळून तब्बल ५ वर्षे लोटली तरी या कामांना मुहूर्त मिळेना. रस्त्याचे पण तिन तेरा वाजले आहेत. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्या मुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. परळी तालुक्यातील परळी- मलकापुर- मरळवाडी- मांडवा प्रजिमा-५३ कि.मी.८/२०0, १३/२00 व कि.मी.१५/६00 मध्ये पुलाची पुर्नबाधणी करणे. (अदाजीत किंमत ३ कोटी ५0 लक्ष) रूपये कामाचे भुमीपुजन सोहळा मोठ्या थाटात गुरुवार दि. ३१/१/२०१९ रोजी अनेक मान्यवरांच्या,सबंधित विभागाचे अधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मलकापूर, मांडवा, मरळवाडी यासह अनेक गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते. याच दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हे काम सुरु होवु शकले नाही. निवडणक संपल्यावर हि कामे होणार असी नागरिकानां आशा होती मात्र ती फोल ठरली आहे .रस्त्यांच्या कामाचे कार्यारंभ निघुन ५ वर्ष झाले तरी

रस्त्याचे काम अजुन जैसे थेच आहे. त्याच प्रमाणे या रस्त्यावरील नदी, ओढे यावरील पुलांची पुर्नबांधणी, दुरूस्ती उंची वाढविणे इत्यादी कामाचे कार्यारंभ आदेश सुद्या ५ वर्षापुर्वीच काढले होते परतुं अद्यापही हि कामे सुरु झालेली नाही.यात कामात परळी शहरा जवळील घनशी नदी वरील पुलाची उंची वाढवणे, तसेच मलकापूर, मरळवाडी जवळील भगवती नदीवरील छोटा पुलाची उंची वाढवणे, मांडवा जवळील बोरना नदीवरील छोटा असलेल्या पुलाची उंची वाढविणे असे या तीन पुलांना मंजुरी मिळाली होती व पुलांच्या कामासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता मात्र या विकास कामात कुठे माशी शिंकली व ५ वर्ष झाले तरी तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची व पुलांची कामे सबंधित अधिकारी व गुत्तेदार यांनी मिळुन दुर्लक्षित करून रखवडले तर नाही ना अशी शंका गावकऱ्यात उत्पन्न होत आहे. असे प्रकार अनेक ठिकाणी झाले असुन याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधि यांनी जातीने लक्ष देऊन मंजुर झालेल्या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा नाईलाजास्तव सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, इंजिनियर यांना घेराव घालु असा इशारा लामणतांडा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच विजय राठोड, सोबत उपसरपंच कुंडलिक जाधव, ग्रामपंचायत सदस्य रमेश पवार, सुग्रीव पवार, माजी उपसरपंच सुनील पवार, सचिन जाधव, संजय राठोड, भगवान जाधव, ज्ञानोबा चव्हाण, रावसाहेब चव्हाण, अंकुश चव्हाण व ग्रामस्थनी दिला आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025