• Home
  • इतर
  • सहकार क्षेत्रात जुनासुर्ला अग्रेसर व्हावे!*
Image

सहकार क्षेत्रात जुनासुर्ला अग्रेसर व्हावे!*

प्रतिनिधी

प्रतिकार नागरी पतसंस्थेच्या नूतन वास्तू लोकार्पणप्रसंगी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

जुनासुर्ला, दि. १० : ‘विना सहकार नाही उद्धार’, असे म्हटले जाते. जुनासुर्ला येथील प्रतिकार नागरी सहकारी पतसं‌स्थेच्या माध्यमातून गावातील सहकार चळवळ मजबूत व्हावी आणि जुनासुर्ला सहकाराच्या बाबतीत अग्रेसर व्हावे असा शुभेच्छापर संदेश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

जुनासुर्ला येथील प्रतिकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तू लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महिला आघाडी अध्यक्ष अल्का आत्राम,आयोजक चंदू मारगोनवार, मूल भाजपा शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, अमोल चुदरी, संजय येनुरकर, पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश जिल्हावार, उपाध्यक्ष परशुराम नाहगमकर, मानद सदस्य माणिक पाटेवार, वासुदेव समर्थ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जुनासुर्ला येथे अत्याधुनिक सुविधा असलेल्या पतसंस्थेचे कार्यालय उभे झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो. एखाद्या कार्पोरेट बँकेच्या ईमारतीलाही लाजवेल अशी ही सुसज्ज पतसंस्थेची ईमारत आहे. प्रतिकार पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील शोषित, वंचितांना मदत मिळावी. त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता दूर होईल, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. या भागातील लोकांना पतपुरवठा कमी पडत असेल तर प्रतिकार पतसंस्थेने अशांची मदत करावी अशी अपेक्षाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

सहकार क्षेत्राला मजबूत करण्यासाठी विश्वगौरव, देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात प्रथमच सहकार मंत्री हे पद निर्माण केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा या पदाची धुरा समर्थपणे सांभाळत असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. केंद्र सरकारने प्रथमच मत्स्य आणि सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. त्यामुळे देशात आता नीलक्रांती आणि सहकार क्रांती होणार हे निश्चित असल्याचेही ते म्हणाले. चंद्रपुरातील नागरिकांनीही मत्स्य संवर्धन आणि सहकार क्रांतीत सहभागी व्हावे असे अवाहनही ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.

*निधी कमी पडू देणार नाही!*

जुनासुर्ला गावातील विकासासाठी आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहाच्या उभारणीसाठी मदत केली. याशिवाय सभागृह गावात उभी झाली आहेत. रस्त्यांचा विकास करण्यात आला. गावाच्या विकासाबाबत केलेली मागणी नक्की पूर्ण करू अशी ग्वाहीही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिल

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025