• Home
  • इतर
  • संत निरंकारी मिशन द्वारे विश्वव्यापी रक्तदान अभियानाचे आयोजन
Image

संत निरंकारी मिशन द्वारे विश्वव्यापी रक्तदान अभियानाचे आयोजन

प्रतिनिधी

मानवतेचे मसीहा बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण निरंकारी जगतात देश विदेशामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करत ‘मानव एकता दिवस’ या रूपात साजरा केला जातो. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मानव कल्याणार्थ संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन च्या माध्यमातून भारत देशातील मिशनच्या बहुसंख्य शाखांसह मिशनचे पुण्याचे मुख्यालय असलेल्या गंगाधाम येथील संत निरंकारी सत्संग भवन मध्ये देखील रक्तदानाचे महाअभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये मिशनचे अनुयायी मोठ्या संख्येने स्वेच्छेने व उत्स्फूर्तपणे रक्तदान करतील.

सर्वांस विदितच आहे, की युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी सत्याचा बोध प्रदान करून मनुष्य जीवन समस्त भ्रमापासून मुक्त करण्याचे अलौकिक कार्य केले; त्या बरोबरच समाज उत्थानासाठी अनेक कल्याणकारी योजना क्रियान्वित केल्या. त्यामध्ये साधे विवाह, नशा मुक्ति तसेच युवा वर्गाला खेळांच्या प्रति प्रेरित केले. समाजात व्याप्त अनिष्ट गोष्टीच्या त्या कालखंडानंतर बाबा हरदेवसिंहजी यांच्या ‘रक्त नाड्यामध्ये वाहावे , नाल्यांमध्ये नको’ या प्रेरक संदेशातून समस्त निरंकारी भक्तांना एक नवी सकारात्मक दिशा मिळाली. तोच प्रेरक संदेश जीवनात उतरवत निरंकारी भक्त लोककल्याणार्थ आपल्या सेवा प्रदान करत आले आहेत.

संत निरंकारी मंडळाचे पुणे झोनचे झोनल प्रमुख आदरणीय श्री.ताराचंद करमचंदानी यांनी या अभियानाची विस्तृत माहिती देताना सांगितले, की हे महाअभियान भारतातील संत निरंकारी मिशनच्या सर्व ९९ झोन मधील बहुसंख्य शाखांमध्ये राबविले जाईल. त्यामध्ये रक्तदान शिबिरांच्या आयोजनापूर्वी केली जाणारी तपासणी व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. त्या बरोबरच रक्तदात्यांसाठी चहापानाची उचित व्यवस्था केली जाणार आहे. रक्त संकलनासाठी ससून रुग्णालय रक्तपेढी, संत निरंकारी रक्तपेढी , यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी , कमांड हॉस्पिटल रक्तपेढी व अन्य सरकारी रक्त पेढ्यांचे प्रशिक्षित चमू येणार आहेत. मिशनचे सेवादार संपूर्ण आठवडाभर गंगाधाम परिसरातील घराघरांमध्ये जाऊन नागरिकांना रक्तदानाविषयी जागरूक करत आहेत. ठिकठिकाणी पथनाट्य,रॅली च्या माध्यमातून प्रेरणा देखील दिली जात आहे.

उदात्त लोक कल्याणकारी हेतूने आयोजित या अभियानामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवतेच्या दिव्य शिकवणुकीची छाप दिसून येईल जिचा अंगीकार करून निरंकारी जगतातील समस्त भक्तगण प्रेरणा प्राप्त करून आपले जीवन कृतार्थ करत आहेत.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025