प्रतिनिधी
, दि. २४: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मागासवर्गीय महामंडळ पुणे यांच्यावतीने थकीत कर्ज प्रकरणात एकरकमी परतावा (ओटीएस) योजना राबविण्यात येत असून थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
ही योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहणार असून महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.