• Home
  • माझा जिल्हा
  • शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणीसाठी अतिरिक्त रक्कम देऊ नये-कृषि आयुक्त
Image

शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणीसाठी अतिरिक्त रक्कम देऊ नये-कृषि आयुक्त

प्रतिनिधी

शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कमेची मागणी होत असल्यास संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून https://pmfby.gov.in या पोर्टलवर पीक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करता येते. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु. ४० देण्यात येते. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामाकरिता ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन २०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे, शेतकऱ्यांनी कोणतीही अतिरिक्त रक्कम नोंदणीसाठी देऊ नये, असे कृषि विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026