• Home
  • माझा जिल्हा
  • काकडे महाविद्यालयात आयर्न मॅन अजिंक्य साळी यांचा सत्कार संपन्न
Image

काकडे महाविद्यालयात आयर्न मॅन अजिंक्य साळी यांचा सत्कार संपन्न

प्रतिनिधी

        सोमेश्वरनगर- येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजिंक्य साळी होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते.

      नुकत्याच कझाकिस्तान येथे संपन्न झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत बारामती मधील आयर्न मॅन हा बहुमान मिळालेल्या अजिंक्य साळी यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी या स्पर्धेबद्दल माहिती सांगून मुलांनी या स्पर्धेकडे वळाले पाहिजे असे नमूद केले, जीवनाचा खडतर प्रवास करून कसा आयर्न मॅन झालो याची माहिती सांगितली व ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ आहे हा मंत्र सर्व विद्यार्थ्यांनी अंगीकारला पाहिजे असे गौरवोद्गार काढले.

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वायदंडे सरांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून, विद्यार्थ्यांनी आपली बलस्थाने ओळखून तसे प्रयत्न केले पाहिजे, तसेच आपली ध्येयही मोठी असली पाहिजे व ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे असे असे विचार व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्य प्रा.रवींद्र जगताप, व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. सुजाता भोईटे, पर्यवेक्षिका सणस मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली व मनोगता नंतर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व कार्यक्रमचा आनंद घेतला.

       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य‌ प्रा. रवींद्र जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन कु.राजगौरी घाडगे, कु.विशाखा कदम, कु. अहिल्या ठोंबरे, कु. मधुरा टिके तर आभार विशाखा कदम हिने मानले.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026