• Home
  • माझा जिल्हा
  • शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत’ जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन
Image

शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत’ जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी

 ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता जेजुरी पालखी तळ (ता. पुरंदर) येथे आयोजन करण्यात आले आहे.

या महारोजगार मेळावाद्वारे विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांना नोकरीची विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने, त्यांच्यासह इतर सर्वच इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावेत.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आवश्यकतेनुसार संक्षिप्त परिचयासह अर्ज व आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त नोकरीइच्छूक उमेदवारांनी २३ जुलै रोजी सकाळी १० वा. महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026