• Home
  • माझा जिल्हा
  • होलार समाजातील युवकांची होलार समाज यंग ब्रिगेड या संघटनेला सर्वाधिक पसंती….!
Image

होलार समाजातील युवकांची होलार समाज यंग ब्रिगेड या संघटनेला सर्वाधिक पसंती….!

प्रतिनिधी

राज्यभरातील नांदेड, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील तरुणांनी केली सदस्य नोंदणी

  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नामदास यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे कार्य तसेच दादासाहेब संघटनेमध्ये तरुणांना देत असलेले प्राधान्य पाहून त्यांच्या नेतृत्वाखाली होलार समाजाचे युवा नेते सेवक भाऊ अहिवळे (बारामती), हनुमंत दादा केंगार (वालचंदनगर), आण्णासाहेब जहीरे (नांदेड), महेंद्र गोरे (फलटण) अनिल केंगार (वालचंदनगर), सचिन हेगडे (सोलापूर), आनंद अहिवळे (सोलापूर), हनुमंत केंगार (माढा) , सुनिल गोरे (फलटण) अशा राज्यातील अनेक ठिकाणांहून युवकांनी संघटनेमध्ये सदस्य नोंदणी ( प्रवेश ) केली.

बैठकीच्या सुरुवातीस होलार समाजाचे जेष्ठ नेते कै. राजाभाऊ माने सातारा यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सध्या होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेने वर्षभरात केलेले काम बघून महाराष्ट्रातील समाजामध्ये खूप सकारात्मक संदेश समाजामध्ये पोहोचलेला आहे.

        यावेळी संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नामदास यांनी संघटनेमध्ये सदस्य नोंदणी केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.तसेच होलार समाज यंग ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून सर्व युवकांनी महाराष्ट्रामध्ये समाज परिवर्तन घडवून आणायचे आहे.यासाठी युवकांनी पुढे येऊन काम केले पाहिजे .

     *सेवक भाऊ अहिवळे, हनुमंत दादा केंगार, महेंद्र गोरे, अनिल केंगार यांनी मनोगत व्यक्त करताना होलार समाजापुढे असंख्य अडचणी आहेत . त्या दूर करण्याचे आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व समाजाला न्याय देण्याचे काम सर्व युवकांनी एकत्र येऊन करायचे आहे, असे सांगितले*

        यावेळी होलार समाज यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते माळशिरस तालुका व महाराष्ट्राचे नेते दत्ताभाऊ ढोबळे, मार्गदर्शक नेते मल्हारी करडे , मार्गदर्शक नेते आश्वासन गोरवे ,अध्यक्ष सुहास बिरलिंगे साहेब , उपाध्यक्ष मोहन करडे सर , उपाध्यक्ष नाथा व पारसे ,कार्याध्यक्ष सागर भाऊ पारसे, उपाध्यक्ष गोविंद अहिवळे, सचिव दादासाहेब करडे, सहसचिव सचिन हेगडे , बापूसाहेब करडे, हे माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026