प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व सेवारत सैनिक, माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबिय आदींच्या मागण्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २३ नोव्हेंबर रोजी सैनिक दरबार भरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.
सेवारत सैनिक, सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांच्या मागण्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्याने एक सैनिक दरबार भरवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार या सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले असून संबंधितांनी त्यांचे अर्ज सैन्य नंबर, पदनाम, नाव व स्पष्ट विषयांसह तीन प्रतीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दे. हंगे (नि.) पुणे यांनी केले आहे.