बारामती येथे सोयाबीन पीक प्रशिक्षण वर्ग संपन्न*

Uncategorized

बारामती, दि.१२: खरीप हंगाम नियोजनाअंतर्गत सोयाबीन पीक प्रशिक्षण वर्गाचे हनुमान नगर, शारदा नगर रोड येथे मंगळवारी (११ जून) रोजी आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षण वर्गात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संतोष गोडसे व रतन जाधव यांनी पेरणीपूर्व मशागत, कुक्कुटपालन, गाई पालन व त्यांचे संगोपन या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सोयाबीन पिकासाठी करण्यात येणारी बीजप्रक्रिया, परसबागेबाबत कृषी विज्ञान केंद्राच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. उप विभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक प्रतापसिंह शिंदे यांनी कृषी विभागाच्या सोयाबीन शेतीशाळा याविषयी मार्गदर्शन केले.

कृषी सहायक सुप्रिया पवार यांनी खरीप हंगाम नियोजन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या विविध योजना विषयी माहिती दिली. तसेच बियाणे गुणवत्ता चाचणी विषयक प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

यावेळी परिसरातील शेतकरी, हनुमान नगर महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होते.