प्रतिनिधी
माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 7 जून 2024 रोजी अवैद्य पद्धतीने गर्भनिदान चाचणी करून भ्रूण हत्या केल्याप्रकरणी डॉक्टर मधुकर शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला परंतु हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने चुकीची फिर्याद लिहून दाखल झाला आणि यामुळे अशा नराधम डॉक्टरला जामीन सुद्धा प्राप्त झाला. अशा नराधम डॉक्टरला जामीन झाला म्हणजे येणाऱ्या भविष्यात हा असाच भ्रूणहत्या करण्याचे काम सतत करत राहणार कारण पाठीमागे सुद्धा डॉक्टर मधुकर शिंदे ह्या आरोपी वरती विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत
महोदय जर ह्या गुन्ह्याची पुन्हा फेर तपासणी होऊन या गुन्ह्यामध्ये असलेले बारामती शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय युवराज घोडके व त्याचे सहकारी दशरथ यांच्यावरती निलंबनाची कारवाई करून संबंधित गुन्ह्याची फेर तपासणी करण्यात यावी जर लवकरात लवकर पीएसआय युवराज घोडके व त्यांचे सहकारी दशरथ इंगोले यांना तात्काळ निलंबित न केल्यास व या गुन्ह्याची फेर चौकशी न झाल्यास दिनांक 18 जून 2024 रोजी मी चक्री उपोषणाला आपल्या कार्यालयासमोर बसत आहे.
यामध्ये जर माझ्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास किंवा मला दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास यास सर्वस्वी बारामती पोलीस स्टेशनचे पीएसआय युवराज घोडके व त्यांचे सहकारी दशरथ इंगोले व सर्व पोलीस प्रशासन जबाबदार राहतील ही नोंद घ्यावी