प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शासन उपक्रमांतर्गत मादक द्रव्य विरोधी जनजागृती कार्यक्रम दि.२४ जून २०२४ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री.जगदाळे एम.एम. (कोरेगाव कुमठे, सातारा )यांचे व्याख्यान झाले .आपल्या व्याख्यानात त्यांनी व्यसनमुक्ती, मादक द्रव्याचे सेवनाचे शारीरिक मानसिक दुष्परिणाम पर्यावरण जनजागृती पृथ्वीचे वाढते तापमान, अंधश्रद्धा निर्मूलन,पर्यावरण, योग, आणि, निसर्ग संवर्धन या विषयांबद्दल आपल्या खुसखुशीत शैलीत विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी केले. सूत्रसंचालन श्री.राजाराम भगत सर यांनी केले व आभार श्री.विजय सूर्यवंशी सर यांनी मानले..
या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सतिशभैय्या काकडे दे.,उपाध्यक्ष मा. श्री. भीमराव बनसोडे सर,मानद सचिव मा. श्री.मदनराव काकडे दे.यांनी केले.