वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जागतिक अमली पदार्थ विरोध दिनाच्या अनुषंगाने जनजागृती 

Uncategorized

प्रतिनिधी.

न्यू इंग्लिश स्कूल पंढरवाडी चोपडज या ठिकाणी 8 वी ते 10 वी चे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याबाबत पोलीस स्टेशन कडील अंमलदार यांच्याकडून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यान कार्यक्रमास सर्व शिक्षक व एकूण 110 विद्यार्थी हजर होते.

मु.सा. काकडे महाविद्यालय वाघाळवाडी या ठिकाणी विद्यालयातील एकूनं 70 विद्यार्थी यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम बाबत रॅली काढण्यात आली. तसेच पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यान कार्यक्रमास सर्व शिक्षक स्टाफ व एकूण 70 विद्यार्थी हजर होते.

स्वातंत्र्य विद्यामंदिर वडगाव निंबाळकर तालुका बारामती या ठिकाणी सातवी ते दहावी चे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याबाबत पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यान कार्यक्रमास सर्व शिक्षक व एकूण 120 विद्यार्थी हजर होते. तसेच

आंनद विदयालय 10 फाटा सदोबाचिवाडी या ठिकाणी 5 वी ते 10 वी चे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याबाबत पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यान कार्यक्रमास सर्व शिक्षक व एकूण 117 विद्यार्थी हजर होते.

श्री सिद्धेश्वरा हायस्कूल कोऱ्हाळे बु. या ठिकाणी 5 वी ते 7 वी चे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याबाबत पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यान कार्यक्रमास सर्व शिक्षक व एकूण 90 विद्यार्थी हजर होते.
तसेच सोशल मीडिया द्वारे ,पोस्टर द्वारे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम बाबत प्रचार व प्रसार करण्यात आला आहे अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सपोनी सचिन काळे यांनी दिली.