बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकरच्या छोट्या वारकऱ्यांचा पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.१ आणि नं.२ शाळेच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी,विठ्ठल रुक्मिणी गणवेशातील विद्यार्थ्यांनी,टाळ मृदुंग यांच्या साह्याने विठ्ठलनामात परिसर झुमला होता .डोक्यावर तुळस घेतलेल्या मुली,पांढऱ्या रंगातील वारकरी लोकांचे लक्ष वेधून घेत होते.पालक,ग्रामस्थ देखील या दिंडी मध्ये सहभाग घेतला होता .
पायी दिंडी सोहळ्यामधून विद्यार्थ्यांनी शाळेचे महत्व,वृक्षारोपण,पाण्याचा वापर,मुलगा-मुलगी समानता यावर फलक बनवून सामाजिक जागृतीचा संदेश दिले. शाळेतील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळ्याने संत सावतामाळी मंदिर आणि भैरवनाथ मंदिर देवस्थानाला भेट दिली. संत सावतामाळी ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले.यावेळी मुलामुलींनी फुगडया खेळल्या.शिक्षकांनी भक्तिगीते गायली.
पालखी सोहळ्यातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती,छत्रपती जाणता राजा प्रतिष्ठान,आनंदा खोमणे,फळ विक्रेता हनुमंत थोरात यांनी खाऊ आणि फळेवाटप केले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी जाधव,सदस्य स्वप्निल शिंदे,उपाध्यक्ष जीवन राऊत,जितेंद्र पवार,पिंटू किर्वे,समीर आतार,अनिल खोमणे,महेश राऊत,मोहिनी शुभांगी साळवे,शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जाधव,अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुनीता पवार,लता लोणकर,विजया दगडे आणि उपक्रमशील शिक्षक अनिल गवळी उपस्थित होते .