प्रतिनिधी.
.बुवासाहेब हुंबरे यांच्या संकल्पनेतून आणि सूचनेनुसार गावामध्ये झाडे लावा आणि झाडे जगवा हा उपक्रम सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने. आज दिनांक ७/७/२०२४ रोजी गावातीलच मरी माता मंदिरा शेजारी श्री. संतोषराव हूंबरे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस करंजे, तसेच आनंदराव हूंबरे व चि प्रियांस हर्षद हूंबरे
या तिघांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून करंजे गावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब हूंबरे व मित्रपरिवार यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाचे महत्त्व करंजे गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मंङळींना समजले आहे.
वृक्षारोपण केले तरच व ती झाङे जगवली तर पुढील पिढी आनंदात जगणार आहे.
दिवसें दिवस हवामानात वातावरणात बदल जाणवत आहे.उन्हाळ्यात वातावरण 50 ङिर्गी सेल्सिअस चा पल्ला घाटत आहे.
पाऊस,पर्जन्यमान सृष्टीत बदल होत आहे. वातावरणात थंडावा राहावा.तसेच वातावरणात ऑक्सिजन राहावा.वृक्षतोङी मूळे किंवा वृक्ष कमी झाल्यामूळे दमा रोगाचे प्रचंङ प्रमाण मनुष्य जिवनात वाढले आहे.
वाढदिवस आसो, किंवा लग्न समारंभ आसोत.वृक्षारोपण केले पाहीजे.मानवजातीला पुढील भविष्यासाठी वृक्षांची नितांत आवश्यक्ता आहे.
या प्रसंगी करंजे गावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब हूंबरे, प्रणाली उद्योग समूह अध्यक्ष बुवासाहेब हूंबरे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर, करंजे गावचे जेष्ठ दाजीराम साळवे,शिवसेना विभाग प्रमुख राकेश गायकवाड, नंदकुमार गायकवाड, अनिल हूंबरे, पांडूरंग हूंबरे , पाणी पुरवठा कर्मचारी शंकरराव सावंत आदी उपस्थित होते.