मुख्य मजकुरावर जा
Saturday, 19 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 21 July 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बांगलादेशी घुसखोरांच्या सुटकेसाठी बनावट जामीन; वकिलावर गुन्हा दाखल

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
July 21, 2024 1 मिनिट वाचन 3,505 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पाच घुसखोरांच्या सुटकेसाठी पिंपरी न्यायालयात बनावट टजामीन देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वकिलासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल बबन बनसोडे (वय ३४, रा. लांडेवाडी पोलीस चौकी शेजारी, विठ्ठलनगर, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीला जामीन देण्यासाठी हजर असलेले वकील आणि आरोपीच्या जामिनासाठी वकिलाच्या संपर्कात असलेले नातेवाईक व मित्र अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

ही घटना ३० एप्रिल रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी न्यायालय येथे घडली.

पाच बांगलादेशी नागरिकांना निगडी पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींच्या सुटकेसाठी स्थानिक रहिवासी असणारा जामीनदार द्यायचा होता. मात्र जामीन देण्यासाठी उपस्थित असलेल्या वकिलासह इतर आरोपींनी बनसोडे हे स्वतः न्यायालयात हजर नसतानाही त्यांच्या आधारकार्डाचा वापर करीत

आरोपींना जामीन देऊन न्यायालय व फिर्यादी यांची दिशाभूल करुन फसवणूक केली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख