मुख्य मजकुरावर जा
Saturday, 19 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 05 August 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मैत्रीदिना निमित्त ज्ञानाई काव्य मैफिल संपन्न 

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 5, 2024 1 मिनिट वाचन 3,507 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

येथील ज्ञानाई फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने मैत्री दिनानिमित्त काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते

काव्य मैफिलीच्या अध्यक्षा कवयत्री वसुधा नाईक प्रमुख पाहुणे परिवर्तनवादी कवी समाधान लोणकर तसेच जिंदादिल कवी योगेश हरणे संवेदनशील शाम लाटकर इत्यादी मान्यवर हजर होते

  अध्यक्षा वसुधा नाईक समाधान लोणकर लोककवी सीताराम नरके यांच्या शुभहस्ते भारताचे संविधान पूजन करण्यात आले

 काव्य मैफिलीची सुरूवात ज्येष्ठ ग्रामीणकवी चंद्रकांत जोगदंड यांनी आषाढाचा पाऊस मनामनाची पुरवितो हाऊस अन् मैत्री कशी जपावी ही रचना सादर केली.

समाधान लोणकर पोलिस अधिकारी म्हणाले

       संघर्षाच्या या वाटेवरती

        सुखं माझे ओलीस आहे

        हळव्या मनाचा कवी मी

        पण पेशाने पोलीस आहे

अशा परखड खडे बोल सुनावले अन् सभागृहातील प्रत्येक प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले जिंदादिल कवी योगेश हरणे क्षितीजाच्या पलिकडे ही आपली रचना अप्रतिम सादर केली शाम लाटकर यांनी जगावे पावसा सारखे होवू नको रे पारखे ही रचना सादर केली गीतकार जनाबापू पुणेकर यांनी

  दोन्ही घरचा लाविते दिवा

  आई बाबा मला वाचवा वाचवा

जनाबापू पुणेकर यांनी संदेश

 देणारी रचना सादर करून रसिकांची मने गहिवरून आली

छगन वाघचौरे यांनी प्रेमगीत सादर केले असून अमित भांडे यांची खान्देशी मायबोलीची रचना मनामनाचा वेध घेणारी ठरली

लोककवी सीताराम नरके यांनी तुझ्या साठी ही रचना सादर करतात शिट्ट्या टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले त्याप्रसंगी दिनेश गायकवाड पांडुरंग म्हस्के सुवर्णा वाघमारे सुमित हजारे दिनेश कांबळे देवेंद्र गावंडे प्रतिभा किर्तीकिर्वे आनंदा भारमल बाळासाहेब गिरी काशीनाथ गवळी दिप्ती नेहर अशा तीस कवीनी रचना सादर केल्या आदी मान्यवर साहित्यिक उपस्थित होते

अध्यक्षिय भाषणात वसुधा नाईक म्हणाल्या मैत्री भाव जपले पाहिजेत आपुलकीचा ठेवा जतन करत माणुसकी जिव्हाळा असला तरच मैत्री जिवंत ठेवता येईल

 मैत्री दिनाच्या शुभेच्छा सार्थक होईल मैत्री दिन हा वृद्धिंगत होईल अशाप्रकारे मैत्रीदिन साजरा करण्यात झाला या काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या बहारदार दमदार आवाजात शीघ्रशैलीत चारोळ्या चुटके शेरोशायरी विनोद रंगतदार काव्य मैफिल सजविली

   काव्य मैफिलीचे आभार मानताना मच्छिंद्र नरके म्हणाले आभाराचे भार कशाला तुमच्या आमच्या घराला दार कशाला मी अन् ज्ञानाई फाऊंडेशन आपल्या ऋणानुबंधात राहू इच्छितो मैत्रीदिनाच्या काव्य मैफिलीची सांगता करण्यात आली पुणे येथील नरके पॅलेस मधील ज्ञानाई फाऊंडेशन सभागृहात काव्य मैफिल संपन्न झाली

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख