• Home
  • माझा जिल्हा
  • जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बसला भीषण आग; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले
Image

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बसला भीषण आग; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले

प्रतिनिधी

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली. ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडलेली आहे. सुदैवाने बसमधील ३३ प्रवासी बचावले आहेत.

त्यांना तातडीने बसच्या खाली उतरविण्यात आले. आय.आर.बी आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. परंतु, आगीत बस जळून खाक झाली आहे.

अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.

बंगळुरूवरून जयपूरकडे जात असलेल्या खाजगी बसला अचानक आग लागली. सुदैवाने बसमधील चालक आणि क्लीनरसह ३३ जण सुखरूप बाहेर पडले.

ही घटना सातच्या सुमारास महामार्गावरील वाघजाई मंदिराकडून खाली उताराला लागल्यानंतर घडली. घटनास्थळी तातडीने आय.आर.बी आणि अग्निशमन दल पोहोचले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. परंतु, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. या घटनेमुळे जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026