• Home
  • माझा जिल्हा
  • अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image

अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी

प्रतिनिधी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. पुणे जिल्हयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांततामय वातावरणांत व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जिवीत हानी तसेच सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये यासाठी डॉ.सुहास दिवसे,जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ व शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३) (ओ) व (बी) अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण जिल्हयात दिनांक २५ नोव्हेंबर,२०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत पर्यंत परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बरोबर बाहून नेण्यास मनाई केली आहे.

बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँकेची/संस्थांची/अधिकाऱ्यांवर राहिल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026