प्रतिनिधी.
इचलकरंजी – येथे मुक्त संवाद दीपावली विशेषांक आणि न्यू अर्थव पब्लिकेनश रूई ता हातकणंगले जि कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन इचलकरंजी येथे केले होते या साहित्य संमेलन अध्यक्षपदी माजी प्राचार्य डॉ सुरेश कुराडे साहित्यिक विचारवंत यांनी भूषविले असून उद्घाटक डॉ दीपक चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक इतिहास संशोधक स्वागताध्यक्ष मा. विश्वास पाटील संपादक मुक्त संवाद दीपावली अंक कवी संमेलनाध्यक्ष डॉ लक्ष्मण शंकर हेंबाडे प्रमुख पाहुणे मा. सुरेश कुलकर्णी अध्यक्ष कोडोली साहित्य परिवार मा.पाटलोबा पाटील ज्येष्ठ कवी आनंद हरी सोहळ्याचे उद्घाटन वृक्षास जल अर्पण करण्यात आले मान्यवरांचा सत्कार सन्मान चिन्ह ग्रंथ संच देवून गौरविण्यात आले तसेच माणदेश कवी डॉ लक्ष्मण हेंबाडे यांच्या बोल विठ्ठला विठ्ठला या गीताची ध्वनी फीतीचे अनावरण करण्यात आले प्रकाशन मुक्त संवाद दीपावली अ़ंकाचे प्रकाशन करण्यात आले त्याप्रसंगी स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष यांचे लेखक साहित्यभूषण सत्यवान मंडलिक तसेच थोर समाजसुधारक या पुस्तकाच्या लेखिका शीला सतीश कुमार माने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संमेलनाध्यक्ष प्रा डॉ सुरेश कुराडे व प्रगतीशील शेतकरी रामदास सावंत इतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा जाधव यांनी केले आनंद हरी म्हणाले साहित्याचा गोडवा निर्माण करण्यासाठी दीपावली अंक आदर्श गाव तळसदे रात्री गावात नेटवर्क जामर बसविण्यात आला आहे तर समाजात परिवर्तन होईल अशी ग्वाही दिली.पाटलोबा पाटील म्हणाले बाबू चळवळ ही चालूच आहे पण साहित्यिक चळवळ बरोबर झाडाची काळजी करणे ही काळाची गरज आहे असे ते व्यक्त झाले.सुरेश कुलकर्णी पुढची पिढी सुधारली तरच आपली प्रगती होईल दिवाळी अंकांचे वाचक निर्माण झाले पाहिजेत शब्द प्रयोग योग्य करावा शब्दिक भाषांचा प्रकार बदलत चालला आहे
संमेलनाध्यक्ष डॉ सुरेश कुराडे म्हणाले आजच जगणं विचित्र झाले आहे आपण आपले आदर्श निर्माण केले पाहिजेत पुस्तकात वाचलेली माणसे कुठे गेली फेटे बांधलेली माणसे कुठे गेली शिक्षक नेहमी खरंच बोलतो गावोगावी साहित्य संमेलन होणे गरजेचे आहे सुविचार आपण आत्मसात केले तर मानवी जीवनाचा प्रवाह हाच साहित्य प्रवास आहे माणसं मुकी झाली आहेत समाज प्रबोधन चळवळ चालू ठेवली पाहिजे कवितेची बॅक केली तर साहित्य संमेलन समाजाचा आरसा आहे असा आशावाद व्यक्त केला
साहित्य संमेलनात व्याख्याते कृष्णात करपे यांचे चैतन्याची शब्दफुले व्याख्यान झाले पुस्तक प्रकाशन सोहळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला डॉ सुरेश कुराडे यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला
माणदेश कविवर्य डॉ लक्ष्मण हेंबाडे पांदवाटकार यांना यावर्षीचा राज्यस्तरीय काव्य पुरस्कार डॉ सुरेश कुराडे संमेलनाध्यक्षाच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला या पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन संवेदनशील अभ्यासू वैशाली राऊत यांनी केले
दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन झाले त्याचे अध्यक्ष डॉ लक्ष्मण हेंबाडे यांनी भूषविले असून महाराष्ट्रातील नामवंत कवी कवयित्री उपस्थित होते जिंदादिल कवी गौसपाक मुलाणी अनिल केंगार राहुल राजापुरे परशूराम कांबळे पी के दीपक कुंभार ज्येष्ठ गझलकार सुवर्णा पवार शरद कुंभार बाबा जाधव मेहबूब जमादार सुरेश वडर शैलैश खुडे सुभाष पाटील सुरेश पोवार आनंदराव जाधव आनंद हरी संजय जाधव सुहास परीट संचित कांबळे मनिषा वराळे वैशाली राऊत विनायक कुलकर्णी सुरेखा वाडकर प्रा रविंद्र.पडवळे परशूराम कांबळे सत्यवान मंडलिक साताप्पा सुतार रामचंद्र कांबळे सुरेश कुलकर्णी मधुकर फरांडे अशोक काळे अशा अनेक कवी कवयित्रीनी गझल मुक्त छंद फुले शाहू आंबेडकर महापुरुषांच्या कविता व प्रबोधन मार्मिक वैचारिक भाष्य कविसंमेलनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या शीघ्रशैलीत चारोळ्या विनोद बहारदार दमदार आवाजात शीघ्रशैलीत सूत्रसंचालन केले सर्व निमंत्रित साहित्यिकांचा सन्मान पत्र सन्मान चिन्ह लेखणी दिवाळी अंक देवून सन्मानित करण्यात आले तसेच समारोप आभार सत्यवान मंडलिक यांनी मानले हे साहित्य संमेलन इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाले