• Home
  • माझा जिल्हा
  • मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर पाटीलची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
Image

मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर पाटीलची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी

  सोमेश्वरनगर- महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ४/११/२०२४ते ७/११/२०२४रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण (ब्रेस्टस्ट्रोक २००मीटर प्रथम क्रमांक, १००मीटर,५०मीटर द्वितीय) स्पर्धेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील आर्यवीर अश्विनकुमार पाटील(इयत्ता ११वी वाणिज्य, १७ वर्षे वयोगट) प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवून गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी अभिनंदन केले.

 यशस्वी खेळाडू विद्यार्थ्याला प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप, सुप्रिया काकडे देशमुख-पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026