• Home
  • माझा जिल्हा
  • ७७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी भक्तीभावाने पूर्णत्वास
Image

७७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी भक्तीभावाने पूर्णत्वास

प्रतिनिधी

पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५ हजार स्वयंसेवकांचा सहभाग

            सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाचे दिव्य स्वरूप – ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन १६ ते १८ नोव्हेंबर रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली होणार असून त्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५ हजार महिला व पुरुष सेवादल स्वयंसेवकांनी भाग घेतला असून समागम संपन्न होईपर्यंत ते आपल्या निष्काम सेवा देत राहतील. या दिव्य संत समागमामध्ये समस्त भाविक भक्तगणांना प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ज्ञान, प्रेम आणि भक्तीचा अनुपम संगम पहायला मिळेल, यात तिळमात्र शंका नाही.

            उल्लेखनीय आहे, की जगभरातील समस्त भक्तगण दरवर्षी या भक्ती उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात ज्यामध्ये विविध संस्कृती व सभ्यतांचा अद्भुत संगम आपल्या बहुरंगी छठा घेऊन अनेकतेत एकतेचे अनुपम दृश्य प्रदर्शित करत विश्वबंधुत्वाची साकार चित्र प्रस्तुत करत असते. या भव्य-दिव्य आयोजनामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक-भक्तगण सहभागी होऊन सदगुरूचे दिव्य दर्शन आणि अनमोल प्रवचनांचा लाभ प्राप्त करतील.

            या पावन पर्वाची तयारी भक्तगणांकडून पूर्ण समर्पण व सजगतेने केली जात आहे. समागम परिसर भव्य रूपात सजविण्यात आला असून त्यामध्ये विशाल पंडालामध्ये सर्वांच्या बसण्याची उचित व्यवस्था करण्यात आली आहे. समागम परिक्षेत्रामध्ये जागोजागी एलईडी स्क्रीन लावण्यात येत आहेत ज्या द्वारे मंचावर होणारा प्रत्येक कार्यक्रम हजारोंच्या संख्येमध्ये उपस्थित भक्तगण स्पष्टपणे पाहू शकतील.

            समागम व्यवस्थेच्या अंतर्गत दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी भव्य प्रवेशद्वारांची संरचना मुंबईच्या गोपी ॲन्ड पार्टी टीमकडून निभावली जात असून त्यांची कला व निष्ठा यांचे जीवंत रूप या चित्तवेधक प्रवेशद्वारातून दृष्टिगोचर होते. या आकर्षक कलाकृतीला पाहून हजारोंच्या संख्चेने आलेले भाविक भक्तगण डोळ्यांचे पारने फिटल्याचा आनंद घेतात.

            संपूर्ण समागम परिसर ‘ए, बी, सी व डी’ ग्राउंड अशा चार भागांमध्ये विभाजित केला आहे. त्यापैकी ‘ए’ भाग हा प्रामुख्याने सत्संग समारोह, निरंकारी प्रदर्शनी तसेच संत निरंकारी मंडळाची प्रशासकीय कार्यालये, निरंकारी प्रकाशन, कॅन्‍टीन, सेवादल रॅलीचे स्थान व पार्किंग साठी ठेवण्यात आला आहे. इतर तीन भागांमध्ये भाविक भक्तगणांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामध्ये निवासी तंबू व्यतिरिक्त पिण्याचे पाणी, वीज, सिवरेज यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. समागमामध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. समागम परिसरातील सर्व मैदानांवर लंगर तयार करणे व वितरण करण्याची उचित व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामध्ये सेवादल रात्रंदिवस आपले योगदान देत आहे.

            निरंकारी मिशनचे सचिव श्री.जोगिंदर सुखीजा यांनी सांगितले, की समागमासंबंधी सर्व प्रबंध व्यवस्था सतगुरुंच्या आशीर्वादाने केली जात आहे. कारण सतगुरु माताजींची सदोदित हीच इच्छा असते, की संत समागमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये. निश्चितच सतगुरुंच्या दिव्य शिकवणूकीचाच हा परिणाम आहे, की या पावन संत समागमामध्ये सर्वत्र केवळ प्रेम, सदभाव आणि एकत्वाचाच दिव्य संदेश प्रदर्शित होत आहे. मानवतेच्या या महा समागमामध्ये समस्त बंधु-भगिनी सादर आमंत्रित आहेत.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026