Image

सदोबाचीवाडीत प्रतिभाकाकी रमल्या

सोमेश्वरनगर – प्रतिनिधी

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाकाकी पवार सदोबाचीवाडी येथील जेष्ठ पर्बतराव होळकर यांच्या घरी येतात व होळकर यांचा चिमुकल्या पणतू सोबत गप्पांत दंग होतात. होळकर कुटुंबीय मात्र काकींच्या या प्रेमळ भेटीने भारावून जातात.

   एकीकडे तालुक्यात विधानसभेच्या प्रचाराचा धुराळा उडाला असताना सदोबाच्यावाडीत मात्र ही स्नेहभेट आपुलकी व जिव्हाळा वाढवणारी ठरावी अशी आहे. येथील पर्बतराव होळकर हे प्रतिष्ठित शेतकरी व जेष्ठ आहेत. शरद पवारांचे आणि त्यांचे ही जुने ऋणानुबंध आहेत. काकी घरी आल्याने घर अगदी गजबजून गेले होते. काकींनी घरातील सर्व सदस्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. काकी व पर्बतराव होळकर होळकर यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या गप्पा बराच वेळ रंगल्या होत्या. ही भेट व अनौपचारिक गप्पा मात्र जिव्हाळ्याच्या होत्या.

    राजकारणापलीकडील ही भेट सहृदयी ठरावी अशी होती. काकींच्या भेटीने सदोबाचीवाडी मात्र भारावून गेली होती.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026