• Home
  • माझा जिल्हा
  • ऊस पाचट कुजविण्याची प्रक्रिया करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
Image

ऊस पाचट कुजविण्याची प्रक्रिया करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

प्रतिनिधी

 शेतकऱ्यांना ऊसाच्या पाचटाचे महत्व पटवून देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने मागील २ वर्षापासून ‘ऊस खोडवा उत्पादन व पाचट व्यवस्थापन अभियान’ राबविण्यात येत आहे, ऊसाचे पाचट कट्टी करून कुजविल्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाचट न जाळता त्यावर कुजविण्याची प्रक्रिया करण्याची करावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी यांनी केले आहे.

बारामती कृषी उपविभागात बारामती, दौड, इंदापूर व पुरंदर या ४ तालुक्यात ऊसाचे हंगामनिहाय क्षेत्र आडसाली ३८ हजार ७९७ हेक्टर, पुर्वहंगामी ११ हजार ७६८ हेक्टर, सुरू १० हजार ८७५ हेक्टर व खोडवा २३ हजार ८३८ हेक्टर असे एकूण ८३ हजार २७६ हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे.

ऊस तुटल्यानंतर शिल्लक राहिलेले ऊसाचे बुडके कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत. तुटलेल्या बुडख्यांवर ०.१ टक्के बाविस्टीनची फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध होतो. शेतात प्रति एकर अंदाजे ४ टन पाचट असते. या प्रति एकर पाचटासाठी ४५ किलो युरिया, ५० किलो सुपर फॉस्फेट समप्रमाणात पाचटावर टाकावे व नंतर ५ किलो पाचट कुजविणारे जिवाणू २ टन सेंद्रीय खतात (मळी, कंपोस्ट) समप्रमाणात टाकावे. त्यानंतर पहिले पाणी दयावे. ऊस तुटून गेल्यानंतर पहिल्या १५ दिवसांमध्ये याप्रमाणे पाचट कुजविण्याची प्रक्रिया करावी, असेही श्री. चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026