• Home
  • माझा जिल्हा
  • विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image

विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

प्रतिनिधी

 विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम पेरणे, ता. हवेली येथे दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी २०२५ रोजी साजरा होत असून पुणे ग्रामीण जिल्ह्यात ३० डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून (००.०० वा.) ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत (२४.०० वा.) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

आदेशानुसार या कालावधीत कोणाही व्यक्तीला इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर (सध्याचे एक्स), फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही, असे करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची राहील. पुणे जिल्हा ग्रामीण हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.वि.सं. कलम १८८ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026