• Home
  • माझा जिल्हा
  • सौ. सुचिता जगन्नाथ साळवे. वाघळवाडी,सोमेश्वर नगर.यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार
Image

सौ. सुचिता जगन्नाथ साळवे. वाघळवाडी,सोमेश्वर नगर.यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

नवक्रांती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरअरिंग अँड टेकनोलॉजी बारामती व मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा राज्य स्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी श्री. रविकुमार घोगरे,शर्मिलाताई नलावडे, श्री. धनंजय जमादार,डॉ. सुधीर लांडे, डॉ. सुधीर आटोळे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले
.
साळवे मॅडम या सामाजिक क्षेत्रात गेले 22 वर्ष कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी. मुली,महिला, अपंग, वृद्ध,परित्यक्ता. अनाथ मुले यांच्यासाठी खूप कामे केली आहेत. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप,खाऊ वाटप असेल तसेच विविध महापुरुषांची पुस्तक वाटप त्यांनी केले आहेत.
कित्येक कुटुंब एकत्रित करून सध्या त्यांचा संसार सुखाचा चालला आहे.तुटलेली नवरा बायकोंची नाती पुन्हा नव्याने बहरत आहेत.काही मुली ज्या रस्ता चुकतात त्यांच्या कुटुंबातील लोकांना हतबल झाल्यासारखे वाटते अशा मुलींना त्यांनी योग्य समुपदेशन देऊन त्यांना देखील त्यांनी मदत केली आहे शाळा,महाविद्यालयात त्या मुला मुलींना व्याख्यानातून समुपदेशन करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणतात. त्या महिला पोलिस दक्षता समितीमध्ये गेली वीस वर्षे काम करतात पण चुकीचे निर्णय कधीही घेतले नाहीत त्यामुळे त्यांना माननारा पोलिस वर्ग काही केसेसमधे त्यांची मदतही घेतात पण आजपर्यंत त्यांनी फक्त विनामोबदला सर्व कामे केली आणि करतही आहेत. आणि त्यांना या सर्वात त्यांचे पती डॉ. जगन्नाथ साळवे उपप्राचार्य मु.सा.काकडे कॉलेज हे सर्व सहकार्य आणि अर्थिक मदत करत असतात.समाजात एक प्रकारे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला आहे.सांगण्यासारखे खूप आहे त्यांच्या बद्दल पण थोडक्यात ही थोडी माहिती दिली.आणि यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे कारण खूप लोक काम करायचे म्हणून करतात पण साळवे मॅडम म्हणजे एक पारदर्शक उदाहरण आहे.की ज्या हे सामाजिक कार्य हातात घेऊन काहींना अंधारातून प्रकाशात घेऊन जातात.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026