संपादक मधुकर बनसोडे
सर्वसामान्य जनतेची हक्काची व आपलीशी वाटणारी एसटी आज बिकट परिस्थितीतून जात आहे?याला नक्की जबाबदार कोण एसटी महामंडळाकडून वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचएसटी बसचे खिळ खिळ झाल्याचे चे चित्र दिसत आहे तरीसुद्धा अश्या बसेस प्रवाशांची वाहतूक करत आहेत. संबंधित प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे का? अशी चर्चा एसटी बस प्रवाशांमध्ये चालू असलेली चे समजते एकादी मोठी दुर्दैवी घटना घडल्या नंतर त्याला भरपाई देण्यापेक्षा अगोदरच थोडी दक्षता घेऊन मोडकळीस आलेल्या बसेस वापरा वरती बंदी घालणं योग्य नाही का? काही बस मध्ये बसल्यानंतर जर पाऊस चालू असेल तर त्या बस मध्ये बसच्या खालच्या बाजूने देखील पाणी येत आहे त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ होते.
एसटी बसचे चालक यांच्यासमोर जी काच असते त्या काचेतून देखील आत मध्ये चालकाच्या अंगावरती पाणी येते त्यामुळे चालक डिस्टर्ब होऊ शकत नाही का? खाजगी मध्ये बोलताना चालक व वाहक यांची प्रतिक्रिया घेतली असता ते असे म्हणतात की मागील जन्मी नक्कीच काहीतरी गुन्हा केला असेल? त्यामुळे एसटी मध्ये नोकरी करत आहे संबंधित प्रशासनाने प्रवाशांच्या या जीवन वहिनी कडे त्वरित लक्ष देऊन प्रवाशांची चाललेली हेळसांड थांबवावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.सवलती थोड्या कमी दिल्या तरी चालेल मात्र चांगल्या एसटी बसेस प्रवाशांकरिता उपलब्ध करून द्या अशी मागणी प्रवासी करत आहेत.
एसटी ची दैनियअवस्था झालेला वीडियो