• Home
  • माझा जिल्हा
  • ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या चार इसमांवरती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..
Image

ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या चार इसमांवरती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..

प्रतिनिधी.
दिनांक 07/08/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मरीमाता कलेक्शन जवळ मूर्टी  येथे www.funrep.pro या लिंक वरून मोबाईल मध्ये ID व पासवर्ड पाठवून ऑनलाइन जुगार चालवणारे इसम नामे 1. संतोष रामदास रासकर राहणार करंजे रासकर मळा तालुका बारामती जिल्हा पुणे. 2. महेंद्र रामचंद्र मोरे राहणार मूर्टी  तालुका बारामती जिल्हा पुणे यांना त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल सहित ताब्यात घेऊन चौकशी केली असता, funrep या ॲप वरून ऑनलाईन जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सदरचा ऑनलाइन जुगार हा 3. रोहित पवार पूर्ण नाव माहित नाही राहणार वानेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे व 4. विक्रम जाधव पूर्ण नाव माहित नाही राहणार मोढवे तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्या मदतीने चालवत असल्याचे समोर आले. सदर कारवाईमध्ये एकूण 17850/ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार अमोल भोसले हे करीत आहेत.
सदरची कारवाई माननीय संदीपसिंह गिल्ल , पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, माननीय सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, डी एस वारुळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, अमोल भोसले व एस पी देशमाने ,पोलीस हवालदार यांनी मिळून केली.

Releated Posts

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026