माझा जिल्हा
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत खाते उघडण्याची सुविधा
प्रतिनिधी पुणे दि. ३०: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना त्यांचे बँक खाते उघडण्यासह आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे असून या सुविधेचा लाभ घ्यावा असे, आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे. केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत […]
सोमेश्वर करंडक 2023 मध्ये हे संघ ठरले विजय
प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जाणता राजा मा. श्री. पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता ठरला तनवीर शेखचा माळेगाव क्रिकेट क्लब. बारामती तालुक्यातील या अग्रमानांकित स्पर्धेमध्ये वाई, फलटण, खंडाळा, पुरंदर, बारामती, दौंड, कोरेगाव, शिरूर या तालुक्यामधून आलेल्या संघामधून झालेल्या अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये माळेगाव क्रिकेट क्लब या संघाने बाजी […]
भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन ब्रँडिंग करणे गरजेचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
प्रतिनिधी मुंबई, दि. 30 : भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद महत्वाची ठरणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दोन दिवसांची आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेट
प्रतिनिधी *भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील-मुख्यमंत्री* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य […]
रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर येथे कुटुंब प्रबोधन व होम मिनिस्टर कार्यक्रम जल्लोषात संपन्न.
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर येथे रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हळदीकुंकू समारंभ निमित्त पालकांसाठी कुटुंब प्रबोधन, कुटुंबातील समस्या, कुटुंब मिलन यासारख्या विविध विषयांवर व्याख्यान आयोजित केले होते. यासाठी विवेक पांडकर सर यांनी मार्गदर्शन केले व तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रचंड प्रतिसाद सर्व महिला वर्गांकडून मिळाला. […]
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लिखित ‘भारत मार्ग’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
प्रतिनिधी *सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली-उपमुख्यमंत्री* भारत मार्ग हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारीत सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री […]
सभासदांच्या शेअर्स रक्कमेची कपात तीन टप्यात करावी व शेअर्स रक्कमेतून बांधकामे करू नयेत.. :- श्री सतिश काकडे
प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे या कारखान्याच्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्व साधारण सभा दि.२९/०९/२०२१ रोजी सभासदांच्या एक शेअर्सची किमान किंमत १०००० /- रूपयांवरून १५०००/- रू. करून त्याची वसुली उस बिलातून दोन समान हप्त्यांमध्ये करण्यात यावी असा ठराव झालेला आहे. असे असताना चेअरमन यांना कारखान्यात आर्थिक चणचण भासत असल्याने सभासदांचा प्रति […]
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त १८९ बंद्यांची सुटका
प्रतिनिधी पुणे, दि.२७: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त् भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत घालून देण्यात आलेल्या निकषाची पुर्तता केलेल्या राज्यातील कारागृहातील १८९ बंद्यांची सुटका करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार अमरावती मध्यवर्ती […]
जि. प. प्राथमिक शाळा कोळीवस्ती निंबुत येथे ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रतिनिधी शालेय मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निंबुत ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या विद्याताई काकडे,मा.ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय लकडे, विजय लकडे ,विराज जगताप सोमेश्वर सहकारी कारखान्याचे शेतकी अधिकारी संदीप लोखंडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश लकडे, युवा कार्यकर्ते महेश लकडे सत्तारभाई सय्यद,रफिक सय्यद ,अनुप लकडे, आबू लकडे,गणेश लकडे, बारामती पंचायत समितीचे विषय […]
भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना
प्रतिनिधी पुणे दि. २६: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य […]
