प्रतिनिधी – फिरोज भालदार
बदलत्या वातावरणामध्ये आजाराचे प्रमाण वाढीव होताना दिसत आहेत . त्याच अनुषंगाने वडगांव निंबाळकर मधील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी वडगाव निंबाळकर प्राथमिक आरोग्य केंद्र व वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
यामध्ये विद्यार्थ्यांचे सर्व महत्त्वाचे आरोग्य घटक यामध्ये तपासले गेले तसेच विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार मोफत औषधे देण्यात आली. या आरोग्य तपासणी शिबिरात इ.५ वी ते १० वी च्या ४५० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली . यावेळी वडगांव निंबाळकर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.पंढरपुरे मॅडम व सर्व आशा सेविका उपस्थित होत्या. या शिबिरामध्ये उपस्थित डॉक्टर व आशा सेविका यांचे प्रशालेचे प्राचार्य हेमंत तांबे सर यांनी श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले .
कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयक म्हणून जयश्री दरेकर मॅडम यांनी काम पाहिले. याप्रसंगी सर्व महिला शिक्षिका व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय झराड सर यांनी केले तर पर्यवेक्षक हेमंत बगनर सर यांनी उपस्थित डॉक्टर , आशा सेविका व मान्यवर यांचे आभार मानले .