शर्ट नीट न खोचल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी शर्ट नीट न खोचल्याने एका शाळेतील शिक्षकाने सहावीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रक्तबंबाळ झालेला विद्यार्थी घरी पोहोचल्यानंतर पालकांच्या लक्षात हा प्रकार आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.संदेश भोसले (वय २६) असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वारगेट परिसरातील महर्षीनगर […]

Continue Reading

पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार

प्रतिनिधी कोंढवा भागातील बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर कोंढवा भागात पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी दहा, अकरा, तसेच तेरा वर्षाच्या मुलाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलाच्या पालकांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा […]

Continue Reading

काकडे महाविद्यालयात ‘विद्यार्थी सुरक्षा समुपदेशन’ हा कार्यक्रम संपन्न*

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्यासाठी ‘विद्यार्थी सुरक्षा समुपदेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. श्री सचिन काळे व अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिलीप सुतार, श्री ओमासे साहेब, श्री शेंडकर साहेब तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुजाता […]

Continue Reading