Home
*राज्यभरातील माध्यमिक शाळांमधील सर्वच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ वर्षानंतरचा आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार….. शिवाजी खांडेकर*
प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी ५३ कोटी ८६ लाख खर्चास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आश्र्वासित प्रगती योजनेच्या मागणीसाठी आंदोलन उभे करणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाच्या लढ्याला यश मिळेल आहे अशी माहिती शिक्षकेतर महामंडळाचे […]
भारतात घरफोड्या करणारी बांगलादेशी नागरिकांची टोळी अटकेत
प्रतिनिधी मुंबई आणि आसपासची शहरे आणि राज्यात अन्यत्र घरफोड्या करून बांगलादेशात जमीनजुमला खरेदी करणारा सराईत चोर व त्याच्या टोळीला जेरबंद करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. ही बांगलादेशी चोरांची टोळी जेरबंद झाल्याने घरफोडीचे शेकडो गुन्हे उघडकीस येतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपींनी भारतात चोऱ्या करून बांगलादेशात मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे […]
खेळतांना १० वर्षीय मुलाला मांजर चावली, काही तासांतच…
प्रतिनिधी हिंगणा तालुक्यातील उखळी गावात एका १० वर्षीय मुलावर शनिवारी सायंकाळी मांजराने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला ओकारी आली. त्यानंतर काही तासातच मुलाचा मृत्यू झाला. श्रेयांशू क्रिष्णा पेंदाम (११) रा. उखळी, ता. हिंगणा असे या मृत मुलाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास श्रेयांशू काही मित्रांसोबत खेळत होता. सायंकाळी ६ वाजता […]
धावत्या मिनीबसवर गोळीबार
प्रतिनिधी अमरावती शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नागपूर येथे परत जात असलेल्या नागरिकांच्या खासगी प्रवासी मिनीबसवर बोलेरोमधून आलेल्या अज्ञात हल्लखोरांनी केलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले आहे. ही थरारक घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवणगाव नजीक घडली. हल्ल्याचे कारण मात्र कळू शकलेले नाही. नागपूर येथील भाविक पर्यटक एमएच […]
प्रेयसीच्या वडिलाला पाठवली मुलीची अश्लील चित्रफीत
प्रतिनिधी एक तरुण अनेक दिवसांपासून परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवत होता. अश्लील चित्रफीत फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन दबाव टाकत होता. मुलीने विरोध केला असता त्याने तिच्या वडिलांना अश्लील चित्रफीत पाठविली. हा प्रकार शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत समोर आला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. प्रज्योत हरिहर बंडोले (२०) […]
‘त्या’ मृत मजुरांच्या कुटुंबाने अनुभवली माणूसकी, भारावल्या स्थितीत परतीचा प्रवास
प्रतिनिधी निराधार झालेल्या मृत मजुराच्या कुटुंबीयांनी माणूसकी पाहून भारावलेल्या अंत:करणाने मृतदेहासह परतीचा प्रवास सुरू केला. हिंगणघाटलगत कवडघाट येथे रेल्वे पुलाच्या पेंटिंगचे काम सुरू आहे. त्यासाठी रेल्वे कंत्राटदाराने राजस्थानमधून मजूर आणले होते. त्यापैकीच विजय शर्मा व फिरोज खान यांचा रविवारी रात्री पुलावरून कोसळल्याने मृत्यू झाला. सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी आणणाऱ्या कंत्राटदाराने नंतर पळ काढल्याने कुटुंबीय निराधार व […]
वंचित बहुजन आघाडीच्या तालुका युवा उपाध्यक्षपदी विश्वजीत चव्हाण यांची निवड
सोमेश्वरनगर – वंचित बहुजन आघाडीच्या बारामती तालुका युवा आघाडीच्या उपाध्यक्षपदी कोऱ्हाळे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत चव्हाण यांची निवड झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी विश्वजीत चव्हाण यांना निवडीचे पत्र दिले. निवडी नंतर बोलताना विश्वजीत चव्हाण म्हणाले की आगामी काळात बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात वंचित युवा आघाडीची शाखा स्थापन करणार […]
मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना मानसिक व भावनिक आधार द्या – शितल साळुंके
सोमेश्वरनगर – मासिक पाळी ही पूर्णपणे नैसर्गिक व शास्त्रीय गोष्ट आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना वेगळी वागणूक देण्यापेक्षा त्यांना आदर द्या. मानसिक व भावनिक पातळीवर आधार द्या असे मत आरोग्य तज्ज्ञ शितल साळुंके यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात मासिक पाळी या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत […]
बारामती ! पणदरे येथे पशुचिकित्सक चषक क्रिकेट सामने संपन्न .
प्रतिनिधी – फिरोज भालदार दिनांक १० मार्च रोजी पशु वैद्यकीय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवस्थापन सेवा संघ बारामती यांच्या वतीने एकदिवसीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन पणदरे येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर करण्यात आले होते . या सामन्यांमध्ये बारामती सह माण, फलटण,बरड, खंडाळा, माळशिरस ,दौंड, इंदापूर, शिरूर, तालुक्यातील पशु चिकित्सक डॉक्टर आणि विविध औषध कंपन्यांनाचे विक्री प्रतिनिधी (MR) […]
कळव्यात चोरट्यांचा सुळसुळाट! चक्क पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी चोरीला
प्रतिनिधी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची रस्त्याकडेला उभी असलेली दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार कळवा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात मागील काही वर्षांपासून रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या वाहनांच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. कळवा येथील पारसिक नगर परिसरात पोलीस अधिकारी राहातात. ते मुंबई पोलीस दलात साहाय्यक […]