• Home
  • माझा जिल्हा
  • वंचित बहुजन आघाडीच्या तालुका युवा उपाध्यक्षपदी विश्वजीत चव्हाण यांची निवड
Image

वंचित बहुजन आघाडीच्या तालुका युवा उपाध्यक्षपदी विश्वजीत चव्हाण यांची निवड

सोमेश्वरनगर – वंचित बहुजन आघाडीच्या बारामती तालुका युवा आघाडीच्या उपाध्यक्षपदी कोऱ्हाळे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत चव्हाण यांची निवड झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी विश्वजीत चव्हाण यांना निवडीचे पत्र दिले. निवडी नंतर बोलताना विश्वजीत चव्हाण म्हणाले की आगामी काळात बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात वंचित युवा आघाडीची शाखा स्थापन करणार असून समाजातील विविध घटकांना एकत्र घेवून युवकांचे प्रश्न सोडविण्याचे काम राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, पुणे जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल. विश्वजीत चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल समतानगर येथील बौद्ध युवक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर पानसरे, उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, अनिल चव्हाण, धनंजय पानसरे, कैलास चव्हाण, जितेंद्र चव्हाण, दीपकुमार चव्हाण, स्वप्नील सोनवणे, निलेश सोनवणे उपस्थित होते.

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026