श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न…

Uncategorized

बारामती तालुका प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात दि. १६ जून २०२५ सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यालयात ज्या विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतला आहे ,अशा विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे व निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. भिमराव बनसोडे सर यांनी नवीन पाठ्यपुस्तके देऊन केले.
मा.श्री.अशोकतात्या बनसोडे यांच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत रोपे देऊन केले व आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला, यावेळी बहुसंख्य पालक उपस्थित होते.
तसेच या दिवशी शालेय पोषण आहाराबरोबरच विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.
निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे.व उपाध्यक्षा सौ. सुप्रियाताई पाटील व मानद सचिव मा. श्री.मदनराव काकडे दे.यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या…