सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

Uncategorized

सोमेश्वरनगर – प्रतिनिधी
आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी नवगतांचे मोठ्या उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.
राज्यभरातील शाळा सोमवार दि. १६ जून रोजी सुरू झाल्या आहेत. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक येथे आंबी बुद्रुक, आंबी खुर्द व माळवाडी येथून अनेक विद्यार्थी दाखल झाले. यावेळी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. गुलाबपुष्प देवून सर्व नवागतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आंबी बुद्रुकच्या सरपंच शीतल जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालभाई शेख, माजी उपसरपंच किसन गार्डी, ग्रामपंचायत सदस्या उज्वला दुबळे,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जगताप, दिलीप शेलार, विजय कुतवळ, नरेंद्र साळुंखे उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कुलकर्णी यांच्या अभिनव कल्पनेतून नवागतांचे सेल्फी पॉइंट ला फोटो घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत गडकरी यांनी केले तर आभार संतोष जेधे यांनी मानले.