Home

1 min read

नवरी मिळेना, तरुणांचे मानसिक खच्चीकरण; नोकरी अन् अपेक्षांमुळे रेशीमगाठी लांबणीवर !

प्रतिनिधी पूर्वीच्या काळी १९ ते २२ व्या वर्षी मुला-मुलींची सर्रास लग्न व्हायची. परंतु आता मात्र लग्नाचे वय ३० ते ३८ च्या घरात जाऊन पोहचले आहे. लग्नासाठी मुली मिळत नसल्याने तरुणांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी सरकारी नोकरी किंवा शहरात चांगल्या कंपनीत नोकरीवर असलेलाच जावई पाहिजे असल्याची मानसिकता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस […]

1 min read

पाकिस्तानला जाणारी आण्विक सामग्री जप्त; न्हावा शेवा सीमा शुल्क विभाग आणि सुरक्षा दलाची संयुक्त कारवाई; पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय कराराचा भंग

प्रतिनिधी चीनमार्गे पाकिस्तानला आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी जहाजातून पाठविण्यात येणारे संगणक न्युमेरिकल कंट्रोलचे साहित्य संयुक्त कारवाईत न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. यामध्ये २२,१८० किलोग्रॅम वजनाची ही सामग्री चीनमधील तैयुआन मायिनग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंपनीने पाकिस्तानमधील कॉसमॉस इंजिनीअरच्या नावाने पाठविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल […]

1 min read

सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे एटीएममधून रोकड चोरणारा गजाआड

प्रतिनिधी सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे एटीएममध्ये शिरून रोकड चोरीचा प्रयत्न करणारा चोरटा गजाआड झाला. रविवार पेठेत फडके हौद चौकातील एका एटीएम केंद्रात ही घटना घडली. संतोष लक्ष्मण रौत (वय ३४, रा. पाटील गल्ली, बेळगाव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सुरक्षारक्षक पंकजकुमार यादव याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फडके हौद चौकात आयसीआयसीआय बँकेचे […]

1 min read

गंगाधाम फेज दोनमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून पाच जणांची सुटका

प्रतिनिधी गंगाधाम फेज दोन सोसायटीत सातव्या मजल्यावर सदनिकेत आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून एकाच कुटुंबातील पाच जणांची सुटका करण्यात आली. सात मजली इमारतीत सातव्या मजल्यावर चार खोल्या असलेल्या एका सदनिकेत आग लागली होती .मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. जवानांनी तातडीने धाव घेतली. पाण्याचा मारा सुरु करून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी आतमध्ये […]

1 min read

जवानांच्या घर ते कर्तव्य या गोष्टींवर आधारीत येत्या सात मार्च ला प्रेमवारी प्रोडक्शन प्रस्तुत फौजी-एक ह्रदयस्पर्शी प्रवास या नावाचा वेबसिनेमा युट्युबवर आपल्या भेटीला येतोय.* *निर्माता दिग्दर्शक किरण गाजरे*

आजवर अनेक चित्रपटांमधुन जवान लढाई करताना दाखवले आहेत किंवा त्यांना काही टारगेट देऊन युद्धपट बनवले आहेत.मात्र प्रेमवारी प्रॉडक्शन प्रस्तुत फौजी एक ह्रदयस्पर्शी प्रवास या वेबसिनेमात फौजी सुट्टीला जेव्हा घरी येतो तेव्हा काय होतं ते यात मांडले जाणार आहे. बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा असे टिम चे म्हणणे आहे. याची कथा पटकथा विक्रम पिसाळ यांची असुन […]

1 min read

सोमेश्वरच्या सभासद शेतकऱ्यांना ऊस जळीत न करणेचे आवाहन.

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर १२१ दिवसांमध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७५०० मे.टन एवढी असताना सरासरी प्रतिदिन ९००० मे. टनाने गाळप करीत एकूण १०,८४,२३३ मे.टन ऊसाचे गाळप केले असून यामधून जिल्ह्यामध्ये सर्वोच्च सरासरी ११.७४ टक्के साखर उतारा राखत १२,६७,६५० क्विटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याकडे मुबलक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून, ऊस […]

1 min read

“ब” वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून ५ कोटी केल्याबद्दल* *वारकरी बांधवांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार

प्रतिनिधी.- महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भरणाऱ्या यात्रा-जत्रांना भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या तीर्थक्षेत्रांना वर्षभर भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील “ब” वर्ग तीर्थक्षेत्रांच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने निधीची मर्यादा २ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपये इतकी वाढविली आहे. राज्यातील आध्यात्मिक क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल अखिल […]

1 min read

डोंबिवलीत तरूणाची ऑनलाईन व्यवहारातून ३३ लाखांची फसवणूक

प्रतिनिधी डोंबिवली  येथील एका तरूणाची ऑनलाईन व्यवहारातून भामट्यांनी ३३ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. हेमांशु हर्षदकुमार शहा (४०, रा. विको नाका, एमआयडीसी, डोंबिवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. गेल्या महिन्यात भामट्यांनी तक्रारदार हेमांशु […]

1 min read

शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्याचा वाहन चालक लाच प्रकरणात ताब्यात

प्रतिनिधी वाळूचे जप्त केलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली परत करण्यासाठी लागणारा उपविभागीय अधिकारी यांचा लेखी आदेश देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने वाहन चालकासह खासगी व्यक्तीला ताब्यात घेतले. शिरपूर उपविभागीय अधिकारी यांच्या वाहनावरील चालक मुकेश विसपुते (३५. रा. विमल नगर, शिरपूर) आणि बॉबी उर्फ प्रशांत सनेर ( ५०, रा. […]

1 min read

कागल तालुक्यातील व्हनाळी यात्रेत दोन गटांत मारहाण; अ‍ॅट्रोसिटीसह परस्परविरोधी गुन्हे दाखल

प्रतिनिधी कागल तालुक्यातील व्हनाळी या गावात काल रात्री ऑर्केस्ट्रा सुरू असताना दोन गटांत जोरदार वाद झाला. यातून परस्परांमध्ये बेदम मारहाण झाली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यानंतर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दलित कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]