• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वरच्या सभासद शेतकऱ्यांना ऊस जळीत न करणेचे आवाहन.
Image

सोमेश्वरच्या सभासद शेतकऱ्यांना ऊस जळीत न करणेचे आवाहन.

प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर १२१ दिवसांमध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७५०० मे.टन एवढी असताना सरासरी प्रतिदिन ९००० मे. टनाने गाळप करीत एकूण १०,८४,२३३ मे.टन ऊसाचे गाळप केले असून यामधून जिल्ह्यामध्ये सर्वोच्च सरासरी ११.७४ टक्के साखर उतारा राखत १२,६७,६५० क्विटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याकडे मुबलक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून, ऊस तोडणी वाहतूकीचे योग्य व चांगल्या प्रकारचे नियोजन केल्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात कारखान्याने क्रमांक एकचा साखर उतारा राखत आजअखेरचे गाळप पुर्ण केले आहे. हे गाळप करीत असताना कारखान्याने कार्यक्षेत्रातील आडसाली ७,०६,०१५ मे.टन, पूर्व हंगामी १,१३,३९५ मे.टन, सुरु १३,९९५ मे.टन, खोडवा ६५,४२६ मे.टनाचे गाळप केले असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

श्री जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हंटले आहे की, कारखान्याकडे तोडणी वाहतूक यंत्रणेने शेतकरी सभासदांचा ऊस जळीत करुन आणलेस तोडणी वाहतूक यंत्रणेच्या बीलातून २०० रुपये प्रति टन कपात करणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून त्यासोबतच जर सभासद शेतकऱ्यांच्या सहमतीने ऊस जळीत करुन कारखान्याकडे गाळप करणेचा निर्णय घेतलेस शेतकऱ्यांच्या ऊस बीलातून प्रति मे.टन रु.५०/- प्रमाणे कपात करणेचा निर्णयही घेणेत आले असल्याची माहिती श्री. जगताप यांनी दिली. त्यामुळे कपातीचे नुकसान टाळणेसाठी सभासद शेतकऱ्यांनी आपला चांगला ऊस जळीत करणेस परवानगी देवू नये. कारखान्याकडे नोंद केलेल्या सभासदांच्या व बिगर सभासदांच्या संपुर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना कटीबद्ध असून हा ऊस गाळप करण्याची जबाबदारी कारखान्याची आहे.

श्री. जगताप पुढे म्हणाले की, सध्या ऊस तोडणी करत असताना ऊस तोड यंत्रणेकडून व मजूरांकडून पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी कारखाना प्रशासनाकडे येत असून याबाबत पैशाची मागणी झालेस त्याबाबतची लेखी स्वरुपात सभासद शेतकऱ्यांनी कारखान्यास कळवावे याची चौकशी करुन ऊस तोड यंत्रणेने घेतलेल्या पैशाची कपात त्यांचे ऊस तोडणी वाहतूक बीलातून कपात करुन सभासद शेतकऱ्यांना परत केले जातील.

श्री. जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याने जाहिर केलेल्या धोरणानुसार पुढील हंगामाकरीता सुरु लागणीस रु.१५०/- प्र.टन व खोडव्यासाठी रु.१५०/- प्र.टन अनुदान देणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला असून ही रक्कम पुढील हंगामाच्या तुटणाऱ्या ऊसासाठी लागू असेल.

श्री. जगताप पुढे म्हणाले की, आपल्या कारखान्याची बहुतांश शेती ज्या निरा डावा कालव्यावर अवलंबून असते त्या निरा डावा कालव्याचे आवर्तन कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवारसा यांच्या योग्य नियोजनामुळे व सहकार्यामुळे माहे जून अखेरपर्यंत सुरु राहणार असल्याने शेतकऱ्यांनी सुरुच्या लागणी व तुटणाऱ्या ऊसाचे खोडवे राखावेत असे आवाहन श्री. जगताप यांनी केले.

श्री. जगताप पुढे म्हणाले की, चालू हंगामामध्ये १ मार्चपासून ते हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.१५०/- प्रोत्साहनपर अनुदान देणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला असून त्यामुळे मार्चपासून तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.३,१५०/- असे एकरकमी ऊस बील सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणेत येणार आहे.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026