Home
माळेगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडुन जबरी चोरीचा गुन्हा उघड करीत दोन आरोपींना मुददेमालासह काही तासांतच अटक.
प्रतिनिधी. बारामती परीसरात चोरीचे प्रमाणे वाढले असल्याकारणाने मा. पोलीस अधिक्षक साो यांनी सदर गुन्हे उघड करणेकरीता व त्यावरती प्रतिबंध करणेकरीता गुन्हे पथकाला व पोलीस स्टेशनचे प्रभारी सचिन लोखंडे साो यांना सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे साहेब यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे पथकाने व पोलीस स्टेशनचे इतर अंमलदारांनी पोलीस स्टेशनचे हदिदमध्ये गस्त वाढविली होती दरम्यान […]
येत्या खरीप हंगामात युरिया खतासोबतच अन्य खताचा वापर करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. बारमती, दि.६: खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांनी पिकासाठी केवळ युरिया खत जास्त प्रमाणात वापरण्याऐवजी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार नत्र, स्फुरद, पालाश युक्त खतांचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. युरिया खतासोबतच अन्य खताचा वापर केल्यास जेणेकरून पिकांना आवश्यकतेनुसार वाढीसाठी प्रमुख अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर होईल. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून आवश्यकतेनुसार खतांचा वापर […]
श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात पर्यावरण दिनाचा निसर्गमय उत्सव.
प्रतिनिधी. निंबूत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात गुरुवार दि.५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचा प्रेरणादायी उपक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध फळ- फुलझाडांच्या बियांपासून सीड बॉल तयार केले. यानंतर विद्यालयात वृक्षारोपण सोहळा पार पडला ज्यात विद्यार्थी […]
विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजन
पुणे प्रतिनिधी – पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार दिनांक ९ जून रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन येथे आयोजित करण्यात आली असल्याचे समितीचे सदस्य सचिव तथा महसूल अपर आयुक्त महेश पाटील यांनी कळविले आहे. प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक […]
उपविभागीय कार्यालय बारामती व इंदापूर तहसिल कार्यालयात 9 जूनला लोकअदालतीचे आयोजन
प्रतिनिधी. अधिकारी कार्यालय बारामती व इंदापूर तहसीलदार कार्यालयांमध्ये सोमवार दि.9 जून रोजी ‘महसूल लोकअदालत’ आयोजित केली आहे. महसूल न्यायप्रक्रियेतील प्रलंबित दाव्यांना सामंजस्याने आणि तडजोडीतून न्याय मिळवून देण्यासाठी लोकअदालत पार पडणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. महसूल विभागात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे दावे अनेकदा वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना मानसिक त्रास सहन […]
बारामती ! पंचक्रोशी प्रकाशन आयोजित काव्य संमेलन बारामती येथे संपन्न.
प्रतिनिधी – फिरोज भालदार भाग्यलक्ष्मी फाउंडेशन चे अध्यक्ष सागर वायाळ तसेच ज्येष्ठ साहित्यिक कवी शांतीलाल ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त १ जून रोजी ज्येष्ठ नागरिक संघ बारामती या ठिकाणी काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्याध्यापिका सुजाता शिंदे यांचा “भलावण” या कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण […]
बीट प्लास्टिक पोल्यूशन’ विषयावर संत निरंकारी मिशनचे व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान देशभरातील १८ तर लोणावळा -खंडाळासह महाराष्ट्रातील ६ स्थानांचा समावेश
प्रकृती परमात्म्याचा अमूल्य उपहार – तिचे संरक्षण आपली जबाबदारी पिंपरी, जून ३, २०२५: प्रकृती मानव जीवनाची सदैव सोबती राहिली आहे, तिच्या सावलीत सभ्यता उदयाला आल्या, संस्कृती विकास पावल्या आणि जीवनाचा सतत विकास होत राहिला. तथापि, मानवाच्या स्वार्थाने जेव्हा संतुलनाची सीमा ओलांडली तेव्हा या जीवनदायीनी प्रकृतीला क्षतिग्रस्त व्हावे लागले. मनुष्य कदाचित हे विसरतो, की तोही या […]
विवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या
प्रतिनिधी छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पती, सासू, सासरे, दिरासह नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतीक्षा अभिषेक खळदकर (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती अभिषेक आनंद खळदकर, सासरे आनंद, सासू सविता, दीर चेतन, नणंद वैभवी (सर्व रा. धनकवडी), तसेच निर्मला […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या आवारात झालेल्या या शिबिरात विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यांनी एका उदात्त कार्यासाठी योगदान देण्याची वचनबद्धता दर्शविली. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व अभिवादन […]
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
प्रतिनिधी – पुणे – प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान पुरस्कार वितरण सोहळ्याचे ३ जून २०२५ रोजी मुख्य बॅडमिंटन हॉल, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी म्हाळुंगे येथे आयोजित करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषद व ग्रामविकास विभाग यांच्यातर्फे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय […]