Home
राज्यात निवडणुकीचा धडाका! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला रणसंग्राम
प्रतिनिधी राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी या जागांसाठी मतदान पार पडणार असून, अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच ७ फेब्रुवारीला गुलाल उधळला जाईल. निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे: अर्ज भरण्यास सुरुवात:१६ जानेवारी २०२६ […]
बारामती तालुक्यातील प्रशालेंमध्ये चांगले शिक्षण दिले जात नाही का ? विद्यार्थ्यांना का पैसे घालवून लावावे लागतात एक्स्ट्रा क्लासेस” बारामती गटशिक्षण अधिकारी यांनी यावरती गांभीर्याने लक्ष्य द्यावे नागरिकांची मागणी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार भविष्यात शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शाळा/कॉलेज असेल तरच विद्यार्थ्यांचे पुढचे भविष्य सुधरते व भविष्यात आपल्या पाल्याला चांगले शिक्षण घेऊन त्याला चांगले ज्ञान मिळवून भविष्यात काहीतरी करता येईल यामुळे पालकांनी शिक्षणाला पहिले प्राधान्य दिले आहे. यामध्ये आता विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा क्लास लावण्याची गरज का पडते ? असा प्रश्न नागरिक व पालकांमध्ये पडला आहे […]
यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली
प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७ ते २४ जानेवारी या कालावधीत प्रदर्शन होणार आहे. यंदा कृषक चा कालावधी वाढला असून आठ दिवस प्रदर्शन भरवले जाणार आहे. कृषिक’ हे जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शन यंदा आपल्या ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. […]
कोंढव्यात पती-पत्नीचा राहत्या घरी मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट
प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथील श्रद्धानगर परिसरात एका ५२ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ४८ वर्षीय पत्नीचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी त्यांचा २३ वर्षांचा मुलगा कामावरून घरी परतला, तेव्हा ही माहिती समोर आली. रात्रपाळी संपवून घरी आलेल्या मुलाने बराच वेळ दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. घरामध्ये त्याचे आई-वडील बेशुद्ध […]
सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.
प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत असुन संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी रु.३,३००/- प्र.मे.टन देण्याचे निश्चित केलेले असुन दि.१५ डिसेंबर अखेर ऊस बिले अदा केली असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. कारखान्याने आज अखेर ६ लाख ३४ हजार १३५ मे. टनाचे […]
सामाजिक एकतेचा सुंदर नमुना : आगवणे कुटुंबीयांना निंबुत समाजसेवा व्हॉट्सॲप ग्रुपची आर्थिक मदत.
प्रतिनिधी. सोशल मीडियाचा वापर कसा करावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे मदन काकडे यांचा समाजसेवा व्हाट्सअप ग्रुप गुड मॉर्निंग गुड नाईट चे मेसेज टाकून इतरांना इरिटेट करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे हे विचारधारा घेऊन जवळच्या सवंगड्यांना एकत्रित करून निंबुत मधील मदनराव काकडे यांनी अकरा वर्षांपूर्वी समाजसेवा या व्हाट्सअप ग्रुप ची स्थापना केली. या व्हाट्सअप ग्रुप […]
काकडे महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न
प्रतिनिधी. सोमेश्वरनगर – येथील मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये कै. मुगुटराव साहेबराव काकडे – देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. नितीन लगड वाघिरे महाविद्यालय सासवड, यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे उपस्थित होते. यावेळी डॉ.लगड यांनी वक्तृत्व ही एक कला आहे, त्यामध्ये नवरसाचा योग्य […]
पेट्रोलिंगमध्येच उघडकीस आली मोटारसायकल चोरीची टोळी, सराईत चोर पोलिसांच्या ताब्यात वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत निंबूत बारामती रोडवर निंबूत गावचे हद्दीत निंबुत छप्री कॅनॉल येथे पेट्रोलिंग दरम्यान संशयीत बिना नंबर प्लेट मोटार सायकल व दुसरी त्याचा सोबतची एक मोटरसायकल थांबवून चौकशी केली असता, बिना नंबर प्लेट मोटरसायकल चां चेसी व इंजिन नंबर वरून माहिती घेतली असता, शिरवळ पोलीस स्टेशन जि. सातारा गुन्हा रजि. नं. […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती
प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याने पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याचे नेतृत्व अनुभवी, संघटनकौशल्य असलेल्या नेत्याकडे सोपविण्यात आल्याने पक्षसंघटना आगामी काळात अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला […]
जिद्द, संयम आणि कष्टांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र शरद लोणकर
सोरटेवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या राजेंद्र लोणकर यांचा संघर्षमय प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत मर्यादित असतानाही त्यांनी शिक्षण आणि ध्येयाशी कधीही तडजोड केली नाही. २०१० साली माध्यमिक विद्यालय करंजे, सोरटेवाडी येथे दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही कामगिरी उल्लेखनीय ठरली. २०१५ मध्ये […]