मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 28 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 01 February 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची 649 वी जयंती निंबुत मध्ये उत्साहात साजरी 

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 1, 2026 1 मिनिट वाचन 8,537 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

 

प्रतिनिधी.
संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची 649 वी जयंती नींबूत येथे साजरी करण्यात आली.
भारतीय संत परंपरेतील एक तेजस्वी आणि समाजप्रबोधन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून संत रोहिदास महाराज यांचे नाव आदराने घे तले जाते. समाजातील विषमता, जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय यांविरुद्ध त्यांनी आपल्या विचारांनी आणि कृतींनी प्रखर लढा दिला. संत रोहिदास महाराज यांची जयंती म्हणजे केवळ एका संताची स्मृती नाही, तर समतेच्या, मानवतेच्या आणि श्रमप्रतिष्ठेच्या विचारांचा जागर आहे.
संत रोहिदास महाराज यांचा जन्म उत्तर भारतातील काशी (वाराणसी) येथे झाला .  कर्माला श्रेष्ठ मानणारे, माणसाला माणूस म्हणून पाहणारे आणि भक्तीला जीवनाचा केंद्रबिंदू मानणारे संत म्हणून त्यांची ओळख आहे. “मन चंगा तो कठौती में गंगा” हा त्यांचा प्रसिद्ध अभंग आजही जीवनमूल्यांचे मर्म सांगतो.
त्या काळात समाजात रूढ असलेल्या जातीभेदाला त्यांनी स्पष्टपणे विरोध केला. देवभक्ती ही केवळ उच्चवर्णीयांची मक्तेदारी नसून ती प्रत्येक सामान्य माणसाचा अधिकार आहे, हा विचार त्यांनी ठामपणे मांडला. त्यांनी उपदेश, अभंग आणि भक्तीपर रचना यांच्या माध्यमातून समाजात परिवर्तनाची चळवळ उभी केली. संत कबीर, मीराबाई यांसारख्या संतांवरही त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.
संत रोहिदास महाराज यांनी स्वप्न पाहिलेले “बेगमपुरा” हे समाजरचनेचे आदर्श रूप होते—जिथे कोणावर अन्याय नाही, भीती नाही आणि सर्वांना समान हक्क आहेत. आजच्या आधुनिक लोकशाही मूल्यांशी सुसंगत असलेले हे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.
त्यांची जयंती विविध ठिकाणी अभंग, कीर्तन, व्याख्याने, सामाजिक उपक्रम आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जाते. समाजातील प्रत्येक घटकाने संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचा अंगीकार करून समतावादी, न्याय्य आणि संवेदनशील समाज घडविण्यासाठी पुढाकार घेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख